नीलगायीची शिकार करणाऱ्या आठ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:00 AM2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:00:53+5:30

पावीमुरांडा नियतक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पांढरीभटाळ येथील नागरिकांनी निलगायीची शिकार केली आहे. निलगायीचे मांस कापून घरी आणले आहे, अशी माहिती कुनघाडा येथील वन परिक्षेत्राधिकारी महेश शिंदे यांना प्राप्त झाली. यावरून पावीमुरांडाचे क्षेत्र सहायक सुरेश गव्हारे, एस.एम. मडावी, वनरक्षक प्रकाश पोराम, संदीप आंबेडारे, नांगसू गोटा आदी वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने पांढरीभटाळ गाव गाठले.

Eight Nilgai hunters arrested | नीलगायीची शिकार करणाऱ्या आठ जणांना अटक

नीलगायीची शिकार करणाऱ्या आठ जणांना अटक

Next
ठळक मुद्देपांढरीभटाळ येथील आरोपी : पायाला जखमी झालेल्या नीलगायीला मारले

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : निलगायीची शिकार करून मांस घरी आणल्याप्रकरणी पांढरीभटाळ येथील आठ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पावीमुरांडा नियतक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पांढरीभटाळ येथील नागरिकांनी निलगायीची शिकार केली आहे. निलगायीचे मांस कापून घरी आणले आहे, अशी माहिती कुनघाडा येथील वन परिक्षेत्राधिकारी महेश शिंदे यांना प्राप्त झाली. यावरून पावीमुरांडाचे क्षेत्र सहायक सुरेश गव्हारे, एस.एम. मडावी, वनरक्षक प्रकाश पोराम, संदीप आंबेडारे, नांगसू गोटा आदी वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने पांढरीभटाळ गाव गाठले.
सर्वप्रथम धनू जाधव यांच्या घराची चौकशी केली असता, त्यांच्या घरी निलगायीचे मांस आढळून आले. धनू जाधव यांच्या मुलाने दारूच्या नशेत वन कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. तसेच बळजबरीने सदर मांस शेतातील विहिरीत फेकून देऊन तो पळून गेला. त्यानंतर धनू जाधव याला वन कर्मचाऱ्यांनी चौकशीकरिता बोलाविले असता, त्याने सांगितले की, हिराचंद मनिराम जाधव व उत्तम धनू राठोड हे आपट्याच्या झाडाचे वाक खोदण्यासाठी जंगलात गेले असता, कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे पायाला जखमी झालेली निलगाय आढळली. तिला ठार मारून गावाजवळील नाल्यात आणले. निलगायीचे मांस कापले. यासाठी गावातील भाऊराव आनंदराव पवार, सदूसिंग अमरसिंग पवार, जागेश्वर महादेव लेकामी, विजय बापू गावडे, सुरेश ऋषी मडावी या इसमांनी सहकार्य केल्याची माहिती दिली. त्यावरून मोका पंचनामा करण्यात आला.
आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून आठ आरोपींना अटक केली. या सर्व आरोपींना न्यायालयाने ३१ मे पर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. घटनेचा पुढील तपास उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक सोनल भडके करीत आहेत.

Web Title: Eight Nilgai hunters arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.