शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण आयुक्तांचा विसोरा शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद

By admin | Updated: January 20, 2016 02:57 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी देसाईगंज तालुक्यातील विसोरा

विसोरा : गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी देसाईगंज तालुक्यातील विसोरा जिल्हा परिषद शाळेला मंगळवारी भेट देऊन येथील विद्यार्थ्यांची मुक्त संवाद साधला. गडचिरोली जिल्ह्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील सर्वच शाळा शिक्षण आयुक्तांनी दत्तक घेतल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विविध उपक्रमांतर्गत शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्याच्याच उद्देशाने विसोरा जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा केली. याप्रसंगी भापकर यांनी शाळाबाह्य, विद्यार्थ्यांच्या समस्यावर शिक्षकांशीही जि.प. शाळेत चर्चा केली. यावेळी शिक्षकांनीही अनेक अडचणी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. विद्यार्थिनींना विविध विषयांबाबत त्यांनी प्रश्न विचारले. (वार्ताहर)बसस्थानकावर विद्यार्थिनींशी बोलले४विनायक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अकरावी, बारावीच्या कसारी, शंकरपूर येथील विद्यार्थिनी एसटीची प्रतीक्षा करीत बसल्या असताना आयुक्त भापकर तेथे पोहोचले. त्यांनी या मुलींशीही संवाद साधला. वेळेवर बस येत नाही, आली तर कधीकधी आम्हाला बसमध्ये घेतही नाही, अशी माहिती विद्यार्थिनींनी आयुक्त भापकर यांना यावेळी दिली. या संदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे त्यांनी विद्यार्थिनीला सांगितले.