शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक कर्जाला निधीचे ग्रहण

By admin | Updated: November 7, 2015 01:31 IST

उच्च शिक्षणासाठी ओबीसी प्रत्येक विद्यार्थ्याला अडीच लाख रूपयापर्यंतची कर्ज मर्यादा निश्चित केली आहे.

ओबीसी विद्यार्थी अडचणीत : प्रत्येकी ३० हजार रूपये देण्याची घोषणा
गडचिरोली : उच्च शिक्षणासाठी ओबीसी प्रत्येक विद्यार्थ्याला अडीच लाख रूपयापर्यंतची कर्ज मर्यादा निश्चित केली आहे. मात्र राज्य शासनाने प्रती विद्यार्थी केवळ ३० हजार रूपये देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी अडचणीत आले आहेत.
ओबीसी समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओबीसी वित्त आणि विकास महामंडळाकडून शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते. सदर कर्ज आरोग्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन व संगणक या व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता केंद्रीय परिषदेची मान्यता असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही कर्ज योजना राबविली जाते. या कर्ज योजनेंतर्गत वर्षाला अडीच लाख व संपूर्ण अभ्यासक्रमासाठी १० लाख रूपयापर्यंत कर्ज दिले जाते. यावर फक्त चार टक्के व्याज आकारण्यात येते. शिक्षण पूर्ण झाल्यावर सहा महिन्यांच्या कालावधीनंतर या कर्जाची परतफेड करण्यास सुरुवात होते.
या योजनेंतर्गत राष्ट्रीय ओबीसी वित्त महामंडळाने राज्य वित्त महामंडळास राज्यातील एकूण २०० विद्यार्थ्यांना फक्त एक कोटी रूपये मंजूर केले आहेत. यातून प्रत्येक विद्यार्थ्याला ५० हजार रूपये वाटप करणे शक्य आहे. त्यातही राज्य महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यातील १० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३० हजार रूपये द्यायचे जाहीर केले आहे. या ३० हजार रूपयांत वर्षभराचा खर्च भागविणे अशक्य आहे.
फ्रिशिप योजनेचा लाभ घेऊनही अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी प्रतीवर्ष किमान दीड लाख रूपयांपर्यंतचा खर्च येतो. तर फ्रिशीप न मिळणाऱ्या विद्यार्थ्याला दोन लाख रूपये खर्च येतो. त्यामुळे ३० हजार रूपयात कसे काय शिक्षण घेणार असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याविरोधात तीव्र लढा उभारण्याचा इशाराही दिला आहे. (नगर प्रतिनिधी)