निर्बंध शिथिल झाल्याने एसटीच्या बसफेऱ्या सुरू, पण प्रवासी घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 05:00 AM2021-06-09T05:00:00+5:302021-06-09T05:00:29+5:30

सोमवारपासून एसटीच्या बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली. असे असले तरी एसटी महामंडळाचे अधिकारी पुरेसे प्रवासी असतील तरच बसफेरी सोडण्यास परवानगी देत आहेत. सध्या गडचिरोली विभागांतर्गत ५० बसेस सुरू आहेत. त्यांच्या दिवसातून १०० फेऱ्या होत आहेत. त्यामुळे महामंडळाला दिवसाकाठी ५ लाखांचेे उत्पन्न होत आहे. अजून बऱ्याच बसगाड्या धावणे सुरू झालेले नाही.

Due to the relaxation of restrictions, ST buses started plying, but the passengers stayed at home | निर्बंध शिथिल झाल्याने एसटीच्या बसफेऱ्या सुरू, पण प्रवासी घरातच

निर्बंध शिथिल झाल्याने एसटीच्या बसफेऱ्या सुरू, पण प्रवासी घरातच

Next
ठळक मुद्देअनेक मार्गांवरील फेऱ्या हाेताहेत प्रवाशांअभावी रद्द

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तब्बल दोन महिन्यानंतर जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध बऱ्याच प्रमाणात शिथिल झाले आहेत. अनेक व्यवहारही सुरू झाले. पण बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दोन दिवसात मोजकीच होती. त्यामुळे एसटीच्या अनेक फेऱ्याही सुरू होऊ शकलेल्या नाहीत. कोरोना कमी झाला असला तरी पूर्ण गेलेला नाही, हे लक्षात ठेवत लोक अत्यावश्यक कामासाठीच प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत.
सोमवारपासून एसटीच्या बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली. असे असले तरी एसटी महामंडळाचे अधिकारी पुरेसे प्रवासी असतील तरच बसफेरी सोडण्यास परवानगी देत आहेत. 
सध्या गडचिरोली विभागांतर्गत ५० बसेस सुरू आहेत. त्यांच्या दिवसातून १०० फेऱ्या होत आहेत. त्यामुळे महामंडळाला दिवसाकाठी ५ लाखांचेे उत्पन्न होत आहे. अजून बऱ्याच बसगाड्या धावणे सुरू झालेले नाही.
जिल्ह्यात सध्या चंद्रपूर, नागपूर, अहेरी या मार्गावर सर्वात जास्त बसफेऱ्या आहेत. प्रवासी संख्या वाढेल तसतशा इतर मार्गावर बसफेऱ्या सोडल्या जाणार आहेत. तोट्यात बसफेऱ्या चालविण्यास एसटीचे अधिकारी तयार नाहीत. परिणामी अनेक चालक-वाहकांना सध्या काम नाही.

ट्रॅव्हल्स बसेस बंदच
नागपूर, चंद्रपूरसह काही प्रमुख मार्गांवर खासगी ट्रॅव्हल्स बसेस माेठ्या प्रमाणावर चालतात. पण लाॅकडाऊनमध्ये शिथीलता मिळाल्यानंतर अजून लाेक प्रवास करण्यास बाहेर पडत नसल्याने ट्रॅव्हल्सच्या बसेस अजुन सुरू झालेल्या नाहीत.

प्रशासनाने परवानगी दिली असली तरी एसटी बसेस चालवताना डिझेलचा खर्चही परवडला पाहिजे. लोकांना जसजसे समजेल तसतसे प्रवासी वाढली. त्यासोबत एसटीच्या फेऱ्याही वाढेल. 
- अशोक वाडिभस्मे, 
विभाग नियंत्रक

प्रवासासाठी प्रत्येकाची वेगवेगळी कारणे

तीन महिन्यानंतर मी आता शहराबाहेर निघालो. चामोर्शीला घरगुती कार्यक्रमासाठी जात आहे. लांबच्या प्रवासाची मात्र अजून हिंमत होत नाही.काेराेनाची भिती अजून कायम आहे.
- दिवाकर कोपुलवार

मी बँकेत अस्थायी कर्मचारी आहे. लॉकडाऊनमध्ये चामोर्शीवरून काही जण मिळून एकाच्या कारने येत होतो. आता एसटी सुरू झाल्याने प्रवासाची सोय झाली. त्यामुळे खर्चही वाचणार आहे.
- स्वप्निल अहिलावार
 

परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी कॉलेजला आले होते. लॉकडाऊनमुळे आतापर्यंत गडचिरोलीत येणे शक्य झाले नाही. दर्शनी गावाला परत जाण्यासाठी दोन तासापासून गाडीची वाट पहात आहे.
- आरती गिरी
 

दिवाळीनंतर पहिल्यांदा माहेरी वडिलांच्या भेटीला आली होती. पण शेतीचा हंगाम सुरू झाल्याने दोनच दिवसात सासरी परत जावे लागत आहे. एसटी बस सुरू झाल्याने दाेन दिवसासाठी का असेना, ही भेट हाेऊ शकली.
- शैला शरद मांदाळे

 

Web Title: Due to the relaxation of restrictions, ST buses started plying, but the passengers stayed at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.