लोकसंख्येनुसार सफाई कामगार भरा
By Admin | Updated: April 2, 2017 01:46 IST2017-04-02T01:46:49+5:302017-04-02T01:46:49+5:30
शहरांच्या लोकसंख्येनुसार सफाई कामगारांची पदे भरण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस,

लोकसंख्येनुसार सफाई कामगार भरा
दिलीप हाथीबेड यांना निवेदन : समस्यांबाबत केली चर्चा
गडचिरोली : शहरांच्या लोकसंख्येनुसार सफाई कामगारांची पदे भरण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, कामगार संघटना गडचिरोलीच्या वतीने भारत सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
दिलीप हाथीबेड हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर ३० व ३१ मार्च रोजी आले होते. यानिमित्त अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेच्या वतीने हाथीबेड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय संघटन मंत्री जयसिंग कछवाह, चंदपाल सोनटक्के, पवन सातपुते, पप्पू गरनिहा, नारनवरे, डॉ. अनिल बघेल, विजय हारकर, संजय राठोड, नरेंद्र साडेकर, श्रीव्यास मान, जिल्हाध्यक्ष छगन महातो, उपाध्यक्ष योगेश सोनवाने, सचिव राजेश मधुमटके, दुग्गा सारोटे, रोहण मधुमटके, नितेश सोनवाने, तेजकुमार सोनेकर, तिनेश महानंदे आदी मान्यवर उपस्थित होते. हाथीबेड यांनी सफाई कामगारासोबत चर्चा केली. त्यांचे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व रोजगार विषयक समस्या जाणून घेतल्या. देसाईगंज नगर परिषदेतील कामगारांची पदे पुनर्जीवित करा, किमान वेतन द्या आदी मागण्या निवेदनातून केल्या असता, त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.