शहरं
Join us  
Trending Stories
1
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
2
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
3
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
4
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
5
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
6
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
7
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
8
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
9
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
10
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
11
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
12
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
13
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
14
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
15
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
16
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
17
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
18
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
19
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
20
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी दालमिल संच वितरणाची कारवाई थंडबस्त्यात

By admin | Updated: June 5, 2015 01:36 IST

जिल्ह्यातील ११ तालुक्यातील २० शेतकरी/महिला बचत गटांना दालमिल यंत्र संच पुरविण्यासाठी १८ लाख रूपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली होती.

गडचिरोली : जिल्ह्यातील ११ तालुक्यातील २० शेतकरी/महिला बचत गटांना दालमिल यंत्र संच पुरविण्यासाठी १८ लाख रूपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली होती. यासंदर्भात आदिवासी विकास विभागाने ३१ मार्च २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता. या गोष्टीला दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र आदिवासी विकास विभागाने जि. प. च्या कृषी विभागाला अद्यापही दालमिल यंत्र पुरविण्याच्या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे सदर योजनेची पुढील कार्यवाही थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते.
शेतकरी/महिला बचत गटाच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नियोजन करून शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. शासनाने दालमिल कृषी प्रक्रियेच्या प्रायोगिक तत्त्वावरील या प्रकल्पास ३१ मार्च २०१५ रोजी मान्यता प्रदान केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात तूर, लाखोळी, हरभरा, उडीद, मूग आदी कडधान्याची खरीप हंगामात पाच हजार ९७० हेक्टर व रबी हंगामात १४ हजार ६७० हेक्टर असे एकूण २० हजार ६४० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. या उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी जिल्ह्यात पुरेशा सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात आर्थिक मोबदला मिळत नाही. जिल्ह्यात होणाऱ्या कडधान्यावर स्थानिक ठिकाणी प्रक्रिया करता यावी, यासाठी ११ तालुक्यातील २० शेतकरी गटांना ९० टक्के अनुदानावर दालमिल व स्पायरल सेपरेटर व धान्य कोठी संच पुरविण्यासाठी शासनाने १८ लाखांच्या अंदाजपत्रकात प्रशासकीय मान्यता प्रदान केली. मात्र आदिवासी विकास विभागाकडून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला निधी न मिळाल्यामुळे शेतकरी गट निवडीची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून मिळाली आहे.
दालमिल यंत्र पुरवठा योजनेसाठी २० गटांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तयार केला आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील तीन, आरमोरी तालुक्यातील तीन, कुरखेडा तालुक्यातील तीन, चामोर्शी तालुक्यातील तीन, मुलचेरा तालुक्यातील दोन, अहेरी तालुक्यातील दोन तसेच कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा आदी तालुक्यातील प्रत्येकी एका शेतकरी महिला गटाचा समावेश आहे. जि. प. कृषी विभाग निधीच्या प्रतीक्षेत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)