शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनामुळे आराेग्य यंत्रणेला मिळाले ३७ डाॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 05:00 IST

प्रशासनामार्फत प्रयत्न करूनही डाॅक्टरांची पदे रिक्त राहतात. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५ एमबीबीएस व ३२ बीएएमएस डाॅक्टरांना काेराेना केवळ कालावधीपर्यंत कंत्राटी तत्वावर नियुक्त  करण्यात आले हाेते. हेच डाॅक्टर आता सेवेत कायम हाेण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दुर्गम भागातील नागरिकांना सेवा मिळण्यास मदत हाेईल. 

ठळक मुद्देसेवेत कायम हाेण्याची शक्यता, ५ एमबीबीएस तर ३२ बीएएमएसचा समावेश

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत ५ एमबीबीएस व ३२ बीएएमएस डाॅक्टरांना नियुक्त करण्यात आले आहे. या डाॅक्टरांना स्थायी करण्याचा विचार शासन करीत आहे. त्यामुळे हे डाॅक्टर भविष्यातही आराेग्य व्यवस्थेत कायम राहण्याची शक्यता असल्याने रिक्त पदांचा भार कमी हाेण्याची शक्यता आहे. गडचिराेली जिल्ह्यात आराेग्याची संपूर्ण मदार शासकीय आराेग्य यंत्रणेवर अवलंबून आहे; मात्र आराेग्य विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. विशेष करून एमबीबीएस डाॅक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. दुर्गम भागात हे डाॅक्टर सेवा देण्यास तयार हाेत नाही. प्रशासनामार्फत प्रयत्न करूनही डाॅक्टरांची पदे रिक्त राहतात. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५ एमबीबीएस व ३२ बीएएमएस डाॅक्टरांना काेराेना केवळ कालावधीपर्यंत कंत्राटी तत्वावर नियुक्त  करण्यात आले हाेते. हेच डाॅक्टर आता सेवेत कायम हाेण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दुर्गम भागातील नागरिकांना सेवा मिळण्यास मदत हाेईल. 

पहिल्यांदाच सर्व जण झाले रूजूगडचिराेली जिल्ह्यातील दुर्गम भागात एमबीबीएस डाॅक्टर सेवा देण्यास तयार हाेत नाही. या डाॅक्टरांना नियुक्तीपत्र दिल्यानंतर ते रूजू हाेत नाहीत किंवा काही दिवसांची सेवा दिल्यानंतर नाेकरी साेडतात; मात्र काेराेना काळात नियुक्ती देण्यात आलेले सर्वच डाॅक्टर रूजू झाले व अजूनही सेवा देत आहेत, ही समाधानाची बाब आहे. 

गडचिराेली जिल्ह्यात डाॅक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे काेराेनाकाळात कंत्राटी तत्त्वावर नेमलेल्या डाॅक्टरांना कायम केले जाण्याची शक्यता आहे. काेराेना काळात नेमलेल्या डाॅक्टरांनी उत्तम प्रकारची सेवा दिली आहे. -कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिराेली.

काेराेनाचे काम जीवावर बेतणारे हाेते. अशाही कालाधीत आपण सेवा दिली आहे. त्यामुळे सेवेत कायम करावे, अशी अपेक्षा आहे. शासन काेणता निर्णय घेते, याची प्रतीक्षा आहे. सेवेत कायम झाल्यास चांगलेच हाेईल. पुन्हा रुग्णांची सेवा करण्याची संधी उपलब्ध हाेईल. -बीएएमएस डाॅक्टर 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर