शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांअभावी अहेरीतील रुग्णांची प्रचंड हेळसांड

By admin | Updated: October 11, 2016 03:15 IST

अहेरी उपजिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्णविभागातील रुग्णांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरच आले नसल्याने

अहेरी : अहेरी उपजिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्णविभागातील रुग्णांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरच आले नसल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सोमवारी प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. रात्रपाळीचे कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांनाच पुन्हा सकाळी कर्तव्यावर यावे लागले. दमट वातावरण असल्यामुळे अहेरी उपविभागातील बहुतांश गावांमध्ये तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे अहेरी उपजिल्हा रुग्णालय रुग्णांनी हाऊसफूल्ल आहे. अनेक रुग्णांना खाली गादीवर झोपून उपचार घ्यावा लागत आहे. ओपीडीमध्येसुद्धा दरदिवशी शेकडो रुग्ण येत आहेत. सोमवारी सकाळी ८ वाजेपासूनच शेकडो महिला व पुरूष रुग्ण अहेरी उपजिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दाखल झाले. चिट्टी काढून डॉक्टरांची वाट बघत होते. बाह्य रुग्ण विभागात डॉ. हकीम यांची ड्यूटी लावण्यात आली होती. मात्र ते रुग्णालयात हजरच झाले नाही. इतर दोन डॉक्टर आरोग्य शिबिरांसाठी बाहेरगावी गेले होते. सकाळी १० वाजूनही डॉक्टर रुग्णालयात न आल्याने काही रुग्णांनी रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून विचारणा केली. १० वाजेपर्यंत शेकडो रुग्ण वाट बघत होते. त्यानंतर दुपारी ११.३० वाजता डॉक्टर इशांत तुरकर यांना रुग्णालयात पाठविण्यात आले. डॉ. तुरकर यांची रात्री ड्यूटी होती. रात्रभर जागून सकाळी घरी परत गेल्यावर पुन्हा त्यांना बोलविण्यात आले. डॉ. उमाटे हे सुद्धा वॉर्डात सेवा देत होते. या दोघांनीही बाह्य रुग्ण विभागातील रुग्ण तपासले. या डॉक्टरांना आंतररुग्ण विभाग, बाह्य रुग्ण विभागसुद्धा सांभाळावा लागला. अहेरी उपजिल्हा रुग्णालयात मागील अनेक वर्षांपासून डॉक्टरांची निम्मी पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला आहे. अहेरी उपजिल्हा रुग्णालय हे अहेरी उपविभागातील एकमेव मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा व मुलचेरा तालुक्यातील शेकडोे रुग्ण येतात. त्यामुळे या रुग्णालयात वर्षभर रुग्णांची गर्दी राहते. लोकप्रतिनिधी रिक्तपदे भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी अनेकदा करण्यात आली असली तरी अजूनपर्यंत सदर पदे भरण्यात आली नाही. (प्रतिनिधी) ४दमट वातावरणामुळे अहेरी उपविभागातील बहुतांश गावांमध्ये तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे अहेरी उपजिल्हा रुग्णालयासह तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्येही रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. अहेरीतील उपजिल्हा रुग्णालय हे सर्वात मोठे रुग्णालय असल्याने या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या शेकडोंच्या घरात राहते. त्यामुळे या ठिकाणची पदे भरणे आवश्यक आहे.