शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

रेखाचित्र, अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2017 00:45 IST

१ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०१७ या कालावधीतील विभागीय परीक्षा बाबतचे पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

जि.प.चे काम प्रभावित : प्रशिक्षणाला भारमुक्त न केल्याचा निषेध गडचिरोली : १ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०१७ या कालावधीतील विभागीय परीक्षा बाबतचे पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. मात्र आयटीआयमध्ये असलेल्या या प्रशिक्षणासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अनेक विभाग प्रमुखांनी अधिनस्त रेखाचित्र व अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांना भारमुक्त केले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद रेखाचित्र अभियांत्रिकी कर्मचारी संघटनेच्या बॅनरखाली सोमवारी एक दिवशीय कामबंद आंदोलन केले. दरम्यान जि.प.च्या प्रवेशद्वारावर प्रशासनाविरोधात निदर्शने केली.या आंदोलनाचे नेतृत्व जि.प. रेखाचित्र, अभियांत्रिकी संघटनेचे अध्यक्ष शरद देविकर, सचिव वागुल नागदेवते, कोषाध्यक्ष दिवाकर ढवळे तसेच रेखाचित्र कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष जी. एन. दहिकर आदींनी केले. आंदोलनादरम्यान संघटनेच्या शिष्टमंडळाने जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल यांना निवदेन दिले. या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, संचालक तंत्रशिक्षण संचालनाकडून स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांचे गडचिरोली येथील आयटीआयमध्ये १ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०१७ या कालावधीतील विभागीय परीक्षाबाबतचे पूर्वप्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाकरिता पात्र स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांना भारमुक्त करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र सदर कालावधीतील कामाचा व्याप व उद्दिष्ट पूर्तीचे कारण पुढे करीत जि.प. प्रशासनाने स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांना प्रशिक्षणाकरिता भारमुक्त करण्यास टाळाटाळ करीत आहे. जि.प. प्रशासनाकडून निर्धारीत प्रशिक्षण वेळापत्रकात बदल करण्याबाबत मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे. याच प्रक्रियेत संपूर्ण प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात येत आहे. प्रशिक्षणाअभावी विभागीय परीक्षेची संधी संबंधित कर्मचाऱ्यांना गमवावी लागत आहे. परिणामी कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहत आहे. जि.प. प्रशासनाकडून अशा प्रकारे अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अश्विनी कावळे, प्रशांत सरोदे, सुचिता वाघमारे, प्रिती नागपुरे, शितल दहेलकर, अश्विनी मेश्राम, प्रगती माकडे, दिवाकर शिंदे, धनंजय धोटे, विक्रांत मेश्राम, दिलीप सज्जनपवार, अमोल काळे, विशाल जवणे, अंकूश अंधारे, अतुल मेश्राम, रवींद्र कुमरे, प्रकाश मरस्कोल्हे आदी कर्मचारी सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)