डॉ. बंग दाम्पत्याला जेआरडी टाटा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 08:04 PM2020-02-26T20:04:36+5:302020-02-26T20:04:56+5:30

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना जेआरडी टाटा अवॉर्ड प्रदान केला जाणार आहे.

Dr. JRD Tata honors award Bang couple | डॉ. बंग दाम्पत्याला जेआरडी टाटा सन्मान

डॉ. बंग दाम्पत्याला जेआरडी टाटा सन्मान

Next

गडचिरोली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना जेआरडी टाटा अवॉर्ड प्रदान केला जाणार आहे. प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते त्यांना २८ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे सन्मानित केले जाणार आहे. पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या ५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील भरीव योगदानासाठी दिल्या जाणा-या ‘जेआरडी टाटा’ सन्मानाचे डॉ. बंग दाम्पत्य पहिले मानकरी ठरले आहेत.
दुर्गम आणि ग्रामीण भागातील बालक व महिलांसाठी ३२ वर्षांपासून ते आरोग्य सेवा देत आहेत. मुक्तिपथ या पथदर्शी प्रकल्पाद्वारे गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न डॉ. बंग दाम्पत्य करीत आहे.

Web Title: Dr. JRD Tata honors award Bang couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.