शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अनाेळखी माणसाला माेबाईल देऊ नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST

यूपीआयने जाेडलेले खाते एकदाच पिन नंबर विचारते. अनेकांना पिन नंबर लक्षात राहत नाही; त्यामुळे नागरिक पिन नंबरही माेबाईलमध्येच सेव्ह करून ठेवतात. ताेही पिन नंबर याच नावाने सेव्ह राहतो. ही बाब चाेरट्यांना माहीत असल्याने तो ते सहज शाेधून बघतात. विशेष म्हणजे एखाद्याला फाेन लावायचा आहे, असे सांगून फाेन मागत असल्याने आपणही त्याकडे लक्ष देत नाही. मात्र यातच घाेळ हाेतो आणि काही कालावधीतच आपले पैसे दुसऱ्या खात्यात वळते केले जातात व आपली फसवणूक हाेऊ शकते. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : अनेक नागरिकांचे स्मार्ट फाेन यूपीआय प्रणालीने बँकेसाेबत जाेडलेले राहतात. त्यामुळे अनाेळखी व्यक्तीच्या हातात काही कालावधीसाठी माेबाईल दिल्यास धाेका हाेऊन बँकेतील संपूर्ण पैसे गहाळ हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा घटना माेठ्या शहरांमध्ये घडत चालल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.यूपीआयने जाेडलेले खाते एकदाच पिन नंबर विचारते. अनेकांना पिन नंबर लक्षात राहत नाही; त्यामुळे नागरिक पिन नंबरही माेबाईलमध्येच सेव्ह करून ठेवतात. ताेही पिन नंबर याच नावाने सेव्ह राहतो. ही बाब चाेरट्यांना माहीत असल्याने तो ते सहज शाेधून बघतात. विशेष म्हणजे एखाद्याला फाेन लावायचा आहे, असे सांगून फाेन मागत असल्याने आपणही त्याकडे लक्ष देत नाही. मात्र यातच घाेळ हाेतो आणि काही कालावधीतच आपले पैसे दुसऱ्या खात्यात वळते केले जातात व आपली फसवणूक हाेऊ शकते. 

ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाते फसवणूक

वेगळी लिंक पाठवून

एक वेगळ्या प्रकारची लिंक  माेबाईलवर पाठविली जाते. यासाेबतच ओटीपी नंबरही मागितला जातो.

केवायसीसाठी फाेन

केवायसीसाठी आवश्यक आहे असे सांगून बँक खात्याची केवायसी अपडेट करायची आहे. ओटीपीशिवाय केवायसी अपडेट हाेत नाही, असे सांगून. 

लाॅटरी लागली आहे

आपल्याला लाॅटरी लागली आहे. बँक खात्यावर पैसे जमा करण्यासाठी ओटीपीची गरज असे सांगितले जाते.

फायनान्सची प्रक्रिया 

तुम्ही फायनान्स घेतला आहे. काही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यामुळे तुमचे बॅंक अकाऊंट नंबर सांगा त्यानंतर ओटीपी येईल. ताे क्रमांक सांगण्यास विचारले जाते.

माेबाईलवर ऑनलाईन पद्धतीने मिळवितात ताबाएखाद्या ॲपची लिंक पाठवून ॲप डाऊनलाेड करण्यास सांगितले जाते. या ॲपमुळे दुसऱ्या हातात माेबाईलचे कंट्राेलिंग जाते. 

ही काळजी घ्या

शिकला-सवरलेला दिसत असेल मात्र ताे जर आपला माेबाईल मागत असेल तर त्याच्या हातात माेबाईल देऊ नका. फाेन करण्यासाठी माेबाईल दिला असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवा.

बँक कधीही फाेन करून बँक खात्याची माहिती विचारत नाही. त्यामुळे बँकेतून बाेलताे, असे सांगितला तरी त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. 

पिन नंबर, सीसीव्ही नंबर माेबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू नका. दुसऱ्या सांगण्यावरून अनाेळखी ॲप डाऊनलाेड करू नये. तसे करणे जाेखमीचे ठरू शकते.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीMobileमोबाइल