शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करू नका

By admin | Updated: July 27, 2014 23:44 IST

धनगर समाजाची संस्कृती आदिवासी समाजापेक्षा भिन्न असल्याने या जातीचा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समावेश करू नये, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे.

गडचिरोली : धनगर समाजाची संस्कृती आदिवासी समाजापेक्षा भिन्न असल्याने या जातीचा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समावेश करू नये, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे. भारतीय घटनेच्या कलम ३४२ अन्वये अनुसूचित जमातीमध्ये ४७ जमातींची सूची जाहीर करण्यात आली आहे. या ४७ जातींपेक्षा धनगर समाजाची संस्कृती व सामाजिक ओळख वेगळी आहे. हा धनगर समाज यापूर्वी ओबीसीमध्ये होता. त्यानंतर त्याला एनटीसीमध्ये टाकण्यात आले. धनगर जातीचा मुख्य व्यवसाय शेळ्या, मेंढ्या पालणे हा आहे. त्यामुळे सदर समाज भटक्या स्वरूपाचा आहे. अनुसूचित जमातीच्या ३६ क्रमांकावर धनगड अशी जात आहे. ती ओरॉन या जातीची पोट जात आहे. ओरॉन ही मुळची ओडीशातील जमात असून तिचे प्रादेशिक नाव धनगड आहे. धनगर व धनगड ही नावे भिन्न असून धनगड ही जमात आहे. तर धनगर ही जात आहे. आदिवासींच्या सोयीसवलतींचा गैरफायदा घेण्यासाठी या जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न चालविला जात आहे. या विरोधात आदिवासी जनता तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. याचबरोबर बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, प्रमाणपत्र पडताळणी समितीचे मत ग्राह्य धरण्यात यावे, अशाही मागण्या केल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भरत येरमे, सरचिटणीस सदानंद ताराम, माधवराव गावड, आनंद कंगाले, भगवान आत्राम, शालीक मानकर, बंडू तिलगामे, राजेश्वर पदा आदी उपस्थित होते.