तेलंगणाची सीमा बंद करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:33 IST2021-04-14T04:33:22+5:302021-04-14T04:33:22+5:30

राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊन व संचारबंदीतून गडचिरोली जिल्ह्याला पूर्णतः वगळून वीकेंड लॉकडाऊन कायम ठेवावे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, दैनंदिन काम ...

Do not close the border of Telangana | तेलंगणाची सीमा बंद करू नका

तेलंगणाची सीमा बंद करू नका

राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊन व संचारबंदीतून गडचिरोली जिल्ह्याला पूर्णतः वगळून वीकेंड लॉकडाऊन कायम ठेवावे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, दैनंदिन काम करणारे कामगार, गोरगरीब मजूर वर्ग व लहान, मोठे व्यापारी वर्ग आणि शेतकरी, शेतमजुरांना दिलासा देण्याची मागणी. गडचिरोली जिल्ह्यात कोरोना संसर्ग मागील वर्षीपासूनच नियंत्रणात आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा संसर्गाचे प्रमाण इतर जिल्ह्यांपेक्षा कमी आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने लागू केलेल्या संपूर्ण लॉकडाऊन व संचारबंदीतूनच उद्योगविरहित या जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनता, मजूर व लहान, मोठे व्यापारी, शेतकरी आणि शेतमजूर हे सावरले नसून, जिल्ह्यातील ८० टक्के लोक आजही आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. राज्य सरकार व जिल्हा प्रशासन या जिल्ह्यावर परत संपूर्ण लाॅकडाऊन व संचारबंदी लादल्यास जिल्ह्यातील समस्त जनतेला याचा फटका बसणार असून, रोजंदारी गरीब मजूर वर्गाला उपासमारीलाही सामोरे जाण्याची पाळी येणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. उद्योगविरहित या जिल्ह्यातील कामगार व मजूरवर्गात अठराविश्वे दारिद्र्य आजही कायम आहेत. कामगारवर्ग व रोजंदारी मजुरांची आर्थिक स्थिती भयावह असून, दैनंदिन मजुरी करून पोट भरणाऱ्या हजारो कुटुंबीयांसह आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेवटचा घटकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार आहे. त्यामुळे लाॅकडाऊन जाहीर करू नये, अशी मागणी रवी सल्लम यांनी केली आहे.

Web Title: Do not close the border of Telangana