शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा काँग्रेसला लागले संघटनात्मक निवडणुकीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 05:00 IST

या बैठकीत विविध विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात खेळीमेळीच्या वातावरणात आणि लोकशाही पद्धतीने संघटनात्मक निवडणुका पार पाडण्यावर सर्वांनी भर दिला. सोबतच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, तसेच येणाऱ्या दिवसांत जिल्हास्तरीय नवसंकल्प अभियान राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडाचीरोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात ही प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्याचा निश्चय गुरुवारी (दि.९) झालेल्या पक्षाच्या बैठकीत करण्यात आला. विशेष म्हणजे या बैठकीला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांपासून तर तरुण पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण एका मंचावर विराजमान होते. त्यामुळे पक्षाला बळकटी देण्यासाठी एकत्रपणे काम करण्यातच भलाई आहे, असा जणू संदेशच या बैठकीतून त्यांनी दिला आहे.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपूर मार्गावरील हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन केले होते. माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, रवींद्र दरेकर, डॉ. नितीन कोडवते, प्रदेश महिला सचिव भावना वानखेडे, बीआरओ अरुण धोटे, घनश्याम फुलचंदाणी, प्रमोद बोरीकर, सोहेल अहमद, अनिक झामा, दामोदर नेवारे, देमेंद्र रहांगडले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.बैठकीला गडचिरोली शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुका अध्यक्ष नेताजी गावतुरे, धानोराचे तालुकाध्यक्ष मनोहर पोरेटी, आरमोरीचे मनोज वनमाळी, देसाईगंजचे परसराम टिकले, कुरखेडाचे जयंत हरडे, कोरचीचे मनोज अग्रवाल, अहेरीचे मुस्ताक हकीम, तसेच प्रभाकर वासेकर, रजनीकांत मोटघरे, पांडुरंग घोटेकर, वामनराव सावसाकडे, देवाजी सोनटक्के यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी निवडणुका व नवसंकल्प अभियानावरही चर्चाया बैठकीत विविध विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात खेळीमेळीच्या वातावरणात आणि लोकशाही पद्धतीने संघटनात्मक निवडणुका पार पाडण्यावर सर्वांनी भर दिला. सोबतच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, तसेच येणाऱ्या दिवसांत जिल्हास्तरीय नवसंकल्प अभियान राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

 

टॅग्स :congressकाँग्रेस