शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेसाठी भूसंपादनाचे काम जिल्हा प्रशासनच करणार

By admin | Updated: October 17, 2016 02:04 IST

वडसा-गडचिरोली या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाररूमने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.

पालक सचिवांच्या बैठकीत निर्णय : रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याचे निर्देशगडचिरोली : वडसा-गडचिरोली या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाररूमने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. त्यांच्या निर्देशानंतर गडचिरोली जिल्हा मुख्यालयात पालक सचिव विकास खारगे यांनी शनिवारी बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या मार्गदर्शनातच जिल्हा प्रशासन करेल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. वडसा-गडचिरोली हा ५२ किमी लांबीचा रेल्वे मार्ग असून या रेल्वे मार्गासाठी वन विभागाची ६९.४ हेक्टर तर शासनाची १२.६३ हेक्टर व खासगी १२५.९१ हेक्टर जमीन लागणार आहे. खासगी जमिनीचे अधिग्रहन वाटाघाटीद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाकडे व बोर्डाकडे जमीन अधिग्रहन करण्याबाबत यंत्रणा नसल्याने त्यांच्या मार्फत कामाला विलंब होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन या निर्णयाची वाट न बघता जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाच्याबाबत तत्काळ पावले उचलावी व नवीन कायद्यानुसार भूसंपादन प्रक्रिया मार्गी लावावी, यासाठी असलेल्या समितीत रेल्वेचाही एक प्रतिनिधी समाविष्ट करून घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहे. रेल्वेच्या प्रत्येक प्रलंबित मुद्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने लक्ष ठेवून असून नक्षलग्रस्त भागातील हा रेल्वे मार्ग तत्काळ पूर्ण करावा, यासाठी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक बैठकाही घेत आहे. यापूर्वीही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन भूसंपादनाच्या कार्याला गती द्यावी, असे निर्देश दिले होते. त्यामुळे आगामी सहा महिन्यापेक्षाही कमी कालावधीत वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम मार्गी लागेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला आहे. याशिवाय जिल्ह्यात ३५० किमी महामार्ग राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करावयाचे आहेत. त्याबाबत वन विभागाची परवानगी देण्याची प्रक्रिया तातडीने व्हावी, याकरिता प्रस्ताव कमीतकमी वेळेत सादर करावेत, असे निर्देश विकास खारगे यांनी या बैठकीत दिले.