सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेला सूचना फलक बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:39 IST2021-02-09T04:39:24+5:302021-02-09T04:39:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : चामोर्शी तालुक्यातील रश्मीपूर येथील नाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूला सावधानतेचा इशारा ...

Disappearance notice board erected by Public Works Department | सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेला सूचना फलक बेपत्ता

सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेला सूचना फलक बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील रश्मीपूर येथील नाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूला सावधानतेचा इशारा देणारा सूचना फलक लावला होता. मात्र, काही दिवसानंतर दोन्ही बाजूला लावलेले सूचना फलक हे पूर्णत: वाकले असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे.

पावसाळ्याच्या दिवसात ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना पूल ओलांडताना धोका निर्माण होऊ नये म्हणून पुलाच्या दाेन्ही बाजूला सूचना फलक लावला हाेता. यातील एका बाजूचा सूचना फलक गायब झाला आहे. हा सूचना फलक नेमका गेला तरी कुठे? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. याच पुलावर गत पावसाळ्यात पुलाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात दुचाकीस्वार पडला होता. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या पुलावरुन नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी हेमंत कुमरे व रश्मिपूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Disappearance notice board erected by Public Works Department