रिंकू शर्मा हत्याकांडातील आराेपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:25 IST2021-02-19T04:25:44+5:302021-02-19T04:25:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी संकलनाचे काम करणाऱ्या दिल्ली येथील मंगोलपुरी भागात राहणाऱ्या ...

Demand for death penalty for Rinku Sharma murder accused | रिंकू शर्मा हत्याकांडातील आराेपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

रिंकू शर्मा हत्याकांडातील आराेपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

सिरोंचा : श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी संकलनाचे काम करणाऱ्या दिल्ली येथील मंगोलपुरी भागात राहणाऱ्या रामभक्त रिंकू शर्मा यांची हत्या करणाऱ्या आराेपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत सिरोंचातील रामभक्तांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींच्या नावे निवेदन दिले.

दिनांक १५ फेब्रवारीला सकाळी ११.३० ते १२.३० वाजताच्या दरम्यान सिरोंचातील श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण कार्यालयात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्रित येत हातात भगवा ध्वज घेऊन हत्या करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमार्गे राजीव चाैकापासून तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार एच. एस. सय्यद यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्वामी बोगोंनी, रामन्ना तोटावार, दामोदर अरिगेला, नरसिंग सिलवेरी, संतोष चंदावार, शिवाजी तोटावार, वसंत तोकला, नागेश ताडबोइना, सुरज दुदी, श्रीधर आनकरी, माधव कासरलावार, दिनेश शुकंरी, शेखर मबबू, लक्ष्मीनारायण संगेम, शंकर घरपट्टी, सुरेश लगावार, तिरुपती नुसेटी आदी उपस्थित होते.

Web Title: Demand for death penalty for Rinku Sharma murder accused