शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

१४ कोटी ५७ लाखांचा तेंदूपत्ता बोनस वितरित

By admin | Updated: October 8, 2014 23:25 IST

सन २०१३ च्या तेंदू हंगामादरम्यान तेंदू संकलन करणाऱ्या मजुरांना वनविभागाकडून बोनस वितरणाची कार्यवाही गतीने सुरू आहे. १५ सप्टेंबर २०१४ पर्यंत पाचही वनविभाग मिळून एकूण १४ कोटी ५७ लाख

पाच वनविभाग : सन २०१३ च्या हंगामातील मजुरांना लाभगडचिरोली : सन २०१३ च्या तेंदू हंगामादरम्यान तेंदू संकलन करणाऱ्या मजुरांना वनविभागाकडून बोनस वितरणाची कार्यवाही गतीने सुरू आहे. १५ सप्टेंबर २०१४ पर्यंत पाचही वनविभाग मिळून एकूण १४ कोटी ५७ लाख ३ हजार ४०३ रूपयांचा तेंदू बोनस वितरीत करण्यात आला आहे. नक्षलग्रस्त, आदिवासी बहूल व वनव्याप्त गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची अर्थव्यवस्था दरवर्षी होणाऱ्या तेंदू हंगामावर अवलंबून असते. तेंदू संकलन हंगामाच्या माध्यमातून जिल्ह्यातील मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. कमी दिवसात अधिक उत्पादन मिळवून देणारे स्त्रोत म्हणून तेंदू संकलन हंगामाकडे बघितले जाते. गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली, भामरागड, सिरोंचा, गडचिरोली व वडसा हे पाच वनविभाग आहेत. सदर पाचही वनविभाग मिळून सन २०१३ च्या हंगामातील १ लाख ८ हजार ७८६ कुटुंब प्रमुखांना एकूण २९ कोटी ६ लाख ८२ हजार ९१४ रूपये बोनसच्या स्वरूपात द्यावयाचे आहे. जिल्ह्यातील पाचही वनविभागाने २०१४ च्या आॅगस्ट महिन्यापासून तेंदू संकलन बोनसचे वितरणाची कारवाई सुरू केली. १५ सप्टेंबरपर्यंत पाचही वनविभाग मिळून ५७ हजार ६१४ कुटुंब प्रमुखांना १४ कोटी ५७ लाख ३ हजार ४०३ रूपये बोनसच्या स्वरूपात वितरीत करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांकडून मिळाली आहे. तेंदूपत्ता बोनस वितरणाची टक्केवारी ५२.९९ इतकी आहे. वनविभागाला पुन्हा १४ कोटी ४९ लाख ७९ हजार ५११ रूपये बोनसच्या स्वरूपात वितरीत करणे शिल्लक आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू असल्याने बोनस वितरणाची कार्यवाही मंदावली आहे. यामुळे अनेक तेंदूपत्ता संकलन मजूर बोनसपासून वंचित आहेत. १५ सप्टेंबरपर्यंत आलापल्ली वनविभागातील ९०.४५ टक्के मजुरांना बोनस वितरीत करण्यात आले आहे. भामरागड वनविभागातील ७४.५४ टक्के मजुरांना बोनसची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सिरोंचा वनविभागातील २१.३८ टक्के तर गडचिरोली वनविभागातील ३९.३४ टक्के मजुरांना बोनसची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. वडसा वनविभागातील ४१.६३ टक्के मजुरांना बोनसची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सध्य:स्थितीत गडचिरोली वनविभागातील मजुरांना ३९ लाख १८ हजार २४, भामरागड वनविभागातील मजुरांना २ कोटी ८७ लाख ३७ हजार ४३२, सिरोंचा वनविभागातील मजुरांना २ कोटी ७० लाख ३ हजार ५७१ रूपये बोनसच्या स्वरूपात वितरीत करणे शिल्लक आहे. गडचिरोली वनविभागातील मजुरांना ४ कोटी ५० लाख ९० हजार ४८१ व वडसा वनविभागातील मजुरांना ४ कोटी २ लाख ३० हजार ३ रूपये बोनसच्या स्वरूपात वितरीत करणे शिल्लक आहे. शिल्लक असलेली बोनसची रक्कम वितरणाची कार्यवाही निवडणुकीनंतर गतीने होणार आहे. त्यादृष्टीने वनविभागाने नियोजन केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)