शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

विलंबाने मेडिकल बायोवेस्टची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 01:12 IST

जिल्ह्यात जिल्हा सामान्य रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयासह खासगी रूग्णालयातील मेडिकल बायोवेस्टची नियमबाह्यपणे...

खासगी कंपनीवर प्रशासन मेहरबान : गडचिरोलीत व्यवस्था निर्माण करण्यास टाळाटाळगडचिरोली : जिल्ह्यात जिल्हा सामान्य रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयासह खासगी रूग्णालयातील मेडिकल बायोवेस्टची नियमबाह्यपणे आठवड्यातून दोनच दिवस वाहतूक करणाऱ्या चंद्रपूर येथील खासगी कंपनीवर आरोग्य यंत्रणेसह सरकारही प्रचंड मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदर खासगी कंपनीची मनमानी खासगी रूग्णालयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालय असूनही येथे बायो मेडिकल वेस्ट डिस्पोझल प्रकल्पाची व्यवस्था का करण्यात येत नाही, याचे उत्तर आरोग्य यंत्रणेनेही समाधानकारक दिलेले नाही. कंपनीने केलेल्या करारानुसार मेडिकल बायोवेस्टची दररोज उचल करणे आवश्यक आहे. मात्र सदर कंपनी दर दिवशी वाहन पाठवून मेडिकल बायो वेस्टची उचल करीत नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत कंपनीला पत्र लिहून दररोज बायो मेडिकल वेस्टची उचल करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र कंपनी दोन ते तीन दिवसाआड वाहन पाठवित आहे. बायो मेडिकल वेस्ट डिस्पोजल प्लॅन्ट उभारणीसाठी जवळपास तीन कोटी रूपयांचा खर्च येतो. प्लॅन्टचे व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे वेतन पकडले तर जिल्हा सामान्य रूग्णालय मेडिकल बायो वेस्ट डिस्पोजलसाठी कंपनीला सध्या देत असलेल्या खर्चाच्या तुलनेत अधिक खर्च येईल. सदर कंपनीची नेमणूक शासनाच्या मार्फतीने केली जाते. यामध्ये रूग्णालयाचा कोणताही हस्तक्षेप राहत नाही. - डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रूग्णालय गडचिरोली२६ आॅगस्ट १९८२ ला गडचिरोली जिल्हा निर्माण झाला. त्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालय निर्माण करण्यात आले. आता आरोग्य यंत्रणेचा पसारा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय हे २०० खाटांचे रूग्णालय आहे. याशिवाय आरमोरी, कुरखेडा व अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालय आहे व गडचिरोली शहरात आता मागील दोन वर्षात जवळजवळ पाच ते सात नव्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलची भर पडली आहे. तसेच १०० खाटांचे महिला व बाल रूग्णालयही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या या रूग्णालयांमधून रूग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. या शस्त्रक्रियांसाठी वापरले जाणारे साहित्य, रूग्णांच्या शस्त्रक्रियेदरम्यान निघालेले मासांचे तुकडे, गोळे, कापसाचे बोळे आदी रूग्णालयात जमा होत असते. या सर्वांची विल्हेवाट वेळेच्या आत लावणे बंधनकारक आहे. त्यासाठी सरकारने जिल्हा सामान्य रूग्णालयासह खासगी रूग्णालयांनाही बंधन घातले आहे. गडचिरोली जिल्ह्याकरिता सदर बायो मेडिकल वेस्ट डिस्पोजेबल व्यवस्थापनाचे काम चंद्रपूर येथील सुप्रभात हायजेनिक डिस्पोझल (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात आला आहे. या कंपनीने दररोज गडचिरोली येथून बायो मेडिकल वेस्ट जमा करून त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावणे आवश्यक आहे. मात्र सदर खासगी कंपनी आठवड्यातून केवळ दोनच दिवस गडचिरोली शहरासह काही तालुका मुख्यालयाच्या खासगी व सरकारी दवाखान्यातून हे बायो मेडिकल वेस्ट जमा करते व ते चंद्रपूर येथे नेते, असे आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी सांगतात. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनीही याबाबीला दुजोरा दिला आहे. आठवड्यातून दोन ते तीनवेळा याची उचल करण्यात येते, असे ते म्हणाले. यासाठी वर्षाला जिल्हा सामान्य रूग्णालय आठ लाख रूपयापेक्षा अधिक पैसा या खासगी कंपनीला देतो व इतर खासगी रूग्णालय खाटांच्या हिशोबानुसार या खासगी कंपनीला पैसे देत असतात. साधारणत: गडचिरोली शहरातील एका खासगी रूग्णालयातून वर्षाला जवळजवळ ५० हजाराच्या घरात ही रक्कम कंपनी पदरात पाडून घेत आहे. शहरासह जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाच्या ठिकाणातील कचरा व इतर जैविक कचऱ्याचीही विल्हेवाट लावण्याची पहिली जबाबदारी स्थानिक नगर पालिका किंवा नगर पंचायत प्रशासनाची आहे. मात्र गडचिरोली नगर पालिकेने आजपर्यंत या संदर्भात कोणतेही पाऊल उचलले नाही. गडचिरोली नगर पालिकेचा कचरा व्यवस्थापन प्रकल्प खरपुंडी मार्गावर असून या ठिकाणी संबंधित बायो मेडिकल वेस्ट डिस्पोझआॅफ करण्यासाठी प्रक्रिया केंद्र तयार करणे गरजेचे आहे. मात्र याकडे नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या मागील भागातही बायो मेडिकल डिस्पोझेबल प्लॅन्ट सुरू केला जाऊ शकतो. यासाठी तीन कोटी रूपयेपर्यंत खर्च अपेक्षीत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते यांनी लोकमतशी बोलताना दिली. मात्र याबाबतचा प्रस्ताव नगर परिषदेने राज्य शासनाकडे पाठविण्याची गरज आहे. मात्र पालिका प्रशासनाने जिल्हा निर्मितीपासून या कामाकडे लक्षच दिलेले नाही. गडचिरोली शहरात दवाखान्यांची संख्या आता वाढतीवर असताना व येथे रूग्णांवरील शस्त्रक्रियांचे प्रमाणही वाढत असताना हा प्रश्न गंभीर झाला आहे. अलिकडेच नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी गडचिरोली शहरातील खासगी रूग्णालय व हॉस्पीटल चालकांची बैठक घेतली व या संदर्भात पालिकेची भूमिका सांगितली. यावेळी अनेक खासगी रूग्णालय चालकांनी या खासगी कंपनीविषयी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी नोंदविल्या. बायो मेडिकल वेस्ट जमा करणाऱ्या कंपनीचे वाहन आठवड्यातून दोनच दिवस येते. रूग्णालयाच्या समोर उभे राहून हॉर्न वाजवित कर्मचारी राहतात. कचरा उचल केल्याची नोंद वहिवर नोंद करण्यास टाळाटाळ करतात. अशा तक्रारींचा पाढा वाचला. मात्र पालिका प्रशासनाने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करण्यास हात वर केले. एका खासगी कंपनीवर नगर पालिका, आरोग्य यंत्रणा, सरकार मेहरबान का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. सदर कंपनीला या कामाचा कंत्राट केंद्र सरकारच्या स्तरावरून देण्यात आला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)विल्हेवाट खरोखरच लावली जाते काय?मांसाचे तुकडे, निकामी झालेल्या इंजेंक्शनच्या सूया व रूग्णालयातून बाहेर पडणारा सर्वच प्रकारचा कचरा सदर बायो मेडिकल वेस्ट वाहतूक करणारी कंपनी घेऊन जाते. चंद्रपूर येथे सदर कचऱ्याची कुठे विल्हेवाट लावली जाते. या विषयी गडचिरोलीतील खासगी डॉक्टरांनाही साशंकता असल्याचे दिसून येत आहे. एक तर तीन दिवस हा कचरा रूग्णालयाच्या परिसरात जमा करून ठेवावा लागतो. गाडीत एक माणूस येतो. तो घेऊन जाता कदाचित हा कचरा गडचिरोलीच्या परिसरातच कोठे टाकत असेल तर माहित नाही, असे म्हणून खासगी रूग्णालय चालकांनी कानावर हात ठेवले आहे. एकूणच हा सारा गंभीर प्रकार केवळ एका खासगी कंपनीला त्यांचा मनमानी कारभार असूनही पोसण्यासाठी केला जात आहे. हे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.