शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची तस्करी करणाऱ्या एका ट्रकसह दाेन ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भेंडाळा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चामाेर्शीच्या नायब तहसीलदारांनी दाेटकुली घाटावर धाड टाकून रेतीची तस्करी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भेंडाळा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चामाेर्शीच्या नायब तहसीलदारांनी दाेटकुली घाटावर धाड टाकून रेतीची तस्करी करणाऱ्या एक ट्रक व दाेन ट्रॅक्टर जप्त केले.

चामोर्शी तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून दोटकुली व वाघोली घाट परिसरात मोठ्या प्रमाणात रेती व मुरुमाची चोरी केली जात आहे. अशातच दोटकुली घाटावरून रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार डी.जी.दुधबळे यांना मिळताच त्यांनी रात्री १२ वाजताच्या दरम्यान आपल्या ताफ्यासह धाड टाकली. दरम्यान, या ठिकाणी रेतीने भरलेल्या पाच ट्रॅक्टरपैकी तीन ट्रॅक्टरधारक घाटावरच रेती खाली करून पळून गेले. उर्वरित दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले. त्यानंतर, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रेतीने भरलेला एक ट्रक पकडला. जप्त केलेली तीनही वाहने तहसील कार्यालयासमाेर उभी करण्यात आली आहेत. यामध्ये एमएच ३३ व्ही २४२३ क्रमांकाचा ट्रॅक्टर व दुसरा ट्रॅक्टर विनाक्रमांकांचा आहे. याशिवाय एमएच ४० एन ४४४३ क्रमांकाचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.