शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दादासाहेबांचे कार्य चिरकाल टिकणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST

अहेरी : माजी मुख्यमंत्री मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांचे कार्य चिरकाल टिकणारे व अविस्मरणीय असून प्रत्येकांनी त्यांचे विचार आत्मसात ...

अहेरी : माजी मुख्यमंत्री मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांचे कार्य चिरकाल टिकणारे व अविस्मरणीय असून प्रत्येकांनी त्यांचे विचार आत्मसात करून त्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

कापेवार-बेलदार समाजाच्या समाजमंदिरासमोरील येथील पटांगणावर १० जानेवारी रोजी मा.सा.कन्नमवार यांच्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते झाले. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अनिल बेझलवार, नायब तहसीलदार वनिता नेरलवार, ज्योस्ना सुधीर नेरळ, वंदना विवेक केळकर आदी उपस्थित होते. राज्याचे दुसरे मुख्यमंत्री स्व. मा.सा.कन्नमवार, सामाजिक नेते स्व.शंकरराव बेझलवार, स्व.शंकरराव गज्जलवार यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून माल्यार्पण करण्यात आले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना आ.धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, नजीकच्या आष्टी येथील मोठ्या पुलाचे शिल्पकार स्व. दादासाहेब कन्नमवार असून माझ्या बाल व तरुणपणी त्यांचे सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील कार्य जवळून बघितले असून कार्य वाख्याणाजाेगे असे सांगितले.

बेलदार-कापेवार समाजाच्या वतीने आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचा सत्कार करण्यात आले. सोबतच दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांचे व जयंती समारोहात कला आणि रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

प्रास्ताविक नगर सेवक अमोल मुक्कावार, संचालन सारिका गडपल्लीवार व सत्यनारायण बंडीवार यांनी केले. तर आभार उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार यांनी मानले.

===Photopath===

110121\11gad_2_11012021_30.jpg

===Caption===

सत्कार करताना आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा सत्कार करताना कापेवार, बेलदार समाज बांधव.