शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

धान विक्रीसाठी केंद्रावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 6:00 AM

धानोरा येथील खरेदी केद्रावर १३ फेब्रुवारीपर्यंत ६ हजार २०० क्विंटल धान खरेदी झाली होती. परंतु गोडावून भरल्याने खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेक शेतकऱ्यांनी आपला धान खरेदी केंद्राच्या आवारात आणून टाकला होता. तर काहींनी आपल्या घरीच साठा करून ठेवला होता. खरेदी बंद पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती.

ठळक मुद्देधानोरा तालुक्यातील शेतकरी त्रस्त : काटा करण्यास होताहे विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : येथील आदिवासी सोसायटीच्या धान खरेदी केंद्रामार्फत धानाची खरेदी केली जात आहे. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने प्रचंड उत्पादन झाले. त्यामुळे शेतकरी धान विक्रीसाठी केंद्रावर आणत आहेत. धानोरा येथील खरेदी केंद्र गोडावून भरल्याने बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता केंद्र पुन्हा सुरू झाले आहे. परंतु धानाचा काटा करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.धानोरा येथील खरेदी केद्रावर १३ फेब्रुवारीपर्यंत ६ हजार २०० क्विंटल धान खरेदी झाली होती. परंतु गोडावून भरल्याने खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेक शेतकऱ्यांनी आपला धान खरेदी केंद्राच्या आवारात आणून टाकला होता. तर काहींनी आपल्या घरीच साठा करून ठेवला होता. खरेदी बंद पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. अखेर शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन केंद्र सुरू करण्याची मागणी केली. तेव्हा तहसीलदारांनीही आपण काहीच करू शकत नाही, असे सांगितले होते. शेवटी महामंडळाचे व्यवस्थापक चौधरी यांची शेतकऱ्यांनी भेट घेऊन खरेदी सुरू करण्याची विनंती केली. तेव्हा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये धान खरेदी सुरू करण्याचे ठरविण्यात आले. अखेर १८ फेब्रुवारीपासून धान खरेदी पुन्हा सुरू झाली. येथील केंद्रावर नगर पंचायत व हेटी, तुकूम, सालेभट्टी, चव्हेला या ग्राम पंचायतीसह १७ गावातील शेतकऱ्यांनी धान आणून टाकला आहे.कमी हमालांमुळे अडचणखरेदी केंद्रावर धानाची आवक वाढल्याने आपला नंबर लागावा म्हणून शेतकऱ्यांमध्ये चढाओढ आहे. यासाठी प्रत्येक ग्रा. पं. मधील शेतकऱ्यांना दोन दिवस ठरवून देण्यात आले आहेत. ठराविक दिवशी सदर ग्राम पंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या धानाचा काटा केला जात आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. परंतु हमालांची संख्या कमी असल्याने काटा वेळेवर होत नाही. या केंद्रावरील धानाची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यांना धान काटा लवकर होण्याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड