शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

नाेंदणीसाठी धान उत्पादकांची गडचिराेलीत उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 05:00 IST

ज्या शेतकऱ्याची नाेंदणी अगाेदर हाेते, त्याला धान खरेदीच्या वेळी अगाेदर बाेेलविले जाते. त्यामुळे नाेंदणीला अतिशय महत्त्व असल्याने आपली नाेंदणी पहिले हाेऊन टाेकन क्रमांक मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली हाेती. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय सकाळी १० वाजता सुरू झाले. मात्र काही शेतकरी अगदी सकाळपासूनच गडचिराेली कृषी उत्पन्न् बाजार समितीच्या आवारात दाखल झाले. काही शेतकऱ्यांनी स्वत:च याद्या तयार करून टाेकनसाठी कृउबास कार्यालयाला सादर केल्या.

ठळक मुद्देटाेकनसाठी धावपळ : गडचिराेली, पाेर्ला, गुरवळा, अमिर्झा, येवलीत सुविधा

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम नाेंदणी करणे आवश्यक आहे. गडचिराेली व चामाेर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात गुरूवारपासून नाेंदणीला सुरूवात झाली असता, पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची माेठ्या प्रमाणात गर्दी उसळली हाेती.बिगर आदिवासी असलेल्या शेतकऱ्यांसाठी मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने गडचिराेली तालुक्यात पाेर्ला, गुरवळा, गडचिराेली, अमिर्झा व चामाेर्शी तालुक्यातील काही ठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहेत. विक्रीदरम्यान गाेंधळ उडू नये यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम नाेंदणी करणे आवश्यक केले आहे. गुरूवारपासून नाेंदणीला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची माेठी गर्दी उसळली हाेती. ज्या शेतकऱ्याची नाेंदणी अगाेदर हाेते, त्याला धान खरेदीच्या वेळी अगाेदर बाेेलविले जाते. त्यामुळे नाेंदणीला अतिशय महत्त्व असल्याने आपली नाेंदणी पहिले हाेऊन टाेकन क्रमांक मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली हाेती. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय सकाळी १० वाजता सुरू झाले. मात्र काही शेतकरी अगदी सकाळपासूनच गडचिराेली कृषी उत्पन्न् बाजार समितीच्या आवारात दाखल झाले. काही शेतकऱ्यांनी स्वत:च याद्या तयार करून टाेकनसाठी कृउबास कार्यालयाला सादर केल्या. यावर इतर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे जे शेतकरी रांगेत उभे आहेत, त्यांनाच प्रथम प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले. तरीही काही प्रमाणात गाेंधळ उडत हाेता. सकाळी १० वाजतानंतर पुन्हा शेतकऱ्यांची गर्दी वाढली. दिवसभर नाेंदणीचे काम सुरूच हाेतेे. 

ही कागदपत्रे आवश्यकनाेंदणीसाठी २०२०-२१ या वर्षाचा तलाठ्याच्या स्वाक्षरीचा सातबारा, नमूना आठ अ, आधारकार्ड, बॅंक पासबुक, रेशनकार्ड व एकाच सातबाऱ्यावर अनेकांची नावे असल्यास इतरांची संमतीपत्रे आवश्यक आहेत. 

मागील वर्षी गडचिराेली तालुक्यात केवळ गडचिराेली व अमिर्झा येथेच धान खरेदी केंद्र हाेते. यावर्षी मात्र धान खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. अमिर्झा, पाेर्ला, गुरवळा व गडचिराेली येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू हाेण्याचे निश्चित झाले आहे. तसेच येवली, पारडी येथेही धान खरेदी केंद्र सुरू हाेण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त धान खरेदी हाेण्याच्या दृष्टीने ज्या ठिकाणी चांगल्या स्थितीतील शासकीय गाेदाम उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहेत.  

बाेनसमुळे शेतकऱ्यांना लाभ यावर्षी ‘अ’ दर्जाच्या धानाला १८८८ तर ‘ब’ दर्जाच्या धानाला १८६८ रुपये प्रतीक्विंटल हमीभाव दिला जाणार आहे. तसेच राज्य शासनाने प्रती क्विंटल ७०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात २ हजार ५०० रुपयांपेक्षा अधिकचा भाव मिळणार आहे. खासगी व्यापारी एवढा भाव देऊ शकत नाही. त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानविक्रीसाठी शेतकरी पसंती दर्शवित आहेत. 

धान विक्रीसाठी टाेकन क्रमांक आवश्यक आहे. शेतकऱ्यांची गैरसाेय टाळण्यासाठी टाेकन पद्धती सुरू करण्यात आली आहे. टाेकन मिळविण्यासाठी नाेंदणीला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरूवात झाली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नाेंदणी करावी. शेतकऱ्यांनी पाखळ, पाण्यात भिजलेला व मातीमिश्रीत असलेला, कीड लागला धान विक्रीस आणू नये.- नरेंद्र राखडे, व्यवस्थापक कृउबास, गडचिराेली

टॅग्स :Farmerशेतकरी