शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

१०५ कोटींचे पीक कर्ज वितरित

By admin | Updated: September 3, 2016 01:30 IST

२०१६-१७ या खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वतीने २४ हजार २९३ शेतकऱ्यांना

२४ हजार २९३ शेतकऱ्यांना लाभ : उद्दिष्टाच्या केवळ ५६ टक्केच कर्जाचे वाटपगडचिरोली : २०१६-१७ या खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वतीने २४ हजार २९३ शेतकऱ्यांना १०४ कोटी ६७ लाख रूपयांच्या कर्ज वितरित करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज वितरणाच्या बाबतीत आघाडीवर असून या बँकेने ४६ कोटी ९५ लाख रूपयांचे कर्ज वितरित केले आहे. शेतीचा खर्च लाखोंच्या घरात पोहोचला आहे. एवढे मोठे भांडवल प्रत्येक शेतकऱ्याकडे राहत नाही. त्यामुळे सदर शेतकऱ्याला जमीन कसण्यासाठी सावकारापुढे हात पुढे करावे लागतात. सावकार ५० ते ६० टक्के व्याज आकारून कर्ज देते. सावकाराच्या पाशातून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी प्रत्येक राष्ट्रीयकृत, सहकारी व ग्रामीण बँकांना कर्ज वितरण करणे सक्तीचे केले आहे. दरवर्षी खरीप हंगामापूर्वी प्रत्येक बँकेला कर्ज वितरणाबाबतचे उद्दिष्ट दिले जाते. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वगळता इतर बँका या उद्दिष्टाच्या जवळपास कधीच पोहोचत नाही. त्यांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ४० ते ५० टक्के एवढेच कर्ज वितरित करतात. चालू खरीप हंगामात १८८ कोटी रूपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले होते. त्यापैकी २० आॅगस्टपर्यंत बँकांनी केवळ २४ हजार ९९३ शेतकऱ्यांना १०४ कोटी ६७ लाख रूपयांचे कर्ज वितरित केले आहे. दिलेल्या उद्दिष्टाच्या ५६ टक्के एवढेच उद्दिष्ट साध्य झाले आहे. उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी बँकांना आणखी ८३ कोटी रूपयांचे कर्ज वितरित करावे लागणार आहे. मात्र आता धान रोवणीची कामे संपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला पैशाची गरज राहिलेली नाही. परिणामी आणखी पीक कर्जाची मागणी होणार नाही. (नगर प्रतिनिधी)