केवळ १४५ गावांमध्ये कोरोना रोगाची एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 05:00 IST2020-10-19T05:00:00+5:302020-10-19T05:00:25+5:30
देशात कोरोनाचा पहिला रूग्ण ३० जानेवारी रोजी आढळून आला. जवळपास साडेतीन महिने गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही. १८ मे रोजी पहिल्यांदा कुरखेडा व चामोर्शी येथे कोरोनाचे रूग्ण आढळून आले. त्यानंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. आता तर कोरोना रूग्णांची संख्या साडेचार हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. रूग्णसंख्या वाढत असली तरी रूग्ण बाधीत गावांची संख्या मात्र मर्यादित असल्याचे दिसून येते.

केवळ १४५ गावांमध्ये कोरोना रोगाची एन्ट्री
दिगांबर जवादे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हाभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली असली तरी काही निवड गावांपुरताच कोरोनाचा प्रसार होत असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६५६ गावे आहेत. त्यापैकी केवळ १४५ गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहे. १५११ गावांमध्ये अजुनही कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही.
देशात कोरोनाचा पहिला रूग्ण ३० जानेवारी रोजी आढळून आला. जवळपास साडेतीन महिने गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही. १८ मे रोजी पहिल्यांदा कुरखेडा व चामोर्शी येथे कोरोनाचे रूग्ण आढळून आले. त्यानंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. आता तर कोरोना रूग्णांची संख्या साडेचार हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. रूग्णसंख्या वाढत असली तरी रूग्ण बाधीत गावांची संख्या मात्र मर्यादित असल्याचे दिसून येते. अहेरी ९, आरमोरी ९, भामरागड ५, चामोर्शी २६, धानोरा १५, एटापल्ली ७, गडचिरोली २६, कुरखेडा १६, कोरची ९, मुलचेरा ७, सिरोंचा ७ व देसाईगंज तालुक्यातील ९ गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत.
आपल्या गावात कोरोना येऊ नये यासाठी गावक-यांनी घेतली ही काळजी
लॉकडाऊनच्या कालावधीत गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवर तपासणी पथक नेमले. दुसऱ्या गावातील व्यक्तीला परवानगीशिवाय प्रवेश दिला नाही.
कोरोनाचे रूग्ण प्रामुख्याने शहरात असल्याने प्रशासकीय कामांसाठी शहरात जाणे ग्रामीण भागातील नागरिकांनी टाळले आहे. त्यामुळे ते सुरक्षित आहेत.
दुर्गम भागातील आदिवासी बहुल गावांमधील नागरिकांच्या गरजा अत्यंत मर्यादीत आहेत. त्यामुळे त्यांना फारशी प्रवासाची गरज पडत नाही.
ग्रामपंचायतींनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तसेच सामान्य फंडातून नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वितरण करून जागृती केली.
स्वच्छतेचे फायदे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी स्वत:हून स्वच्छता बाळगण्यास सुरूवात केली. ग्रामपंचायतींनी फवारणी केली.
लाॅकडाऊनमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा शहराशी संपर्क आला नाही. त्यामुळे अनेक गावे अजुनही काेराेनामुक्त आहेत. मात्र भविष्यात ते काेराेनामुक्त राहतीलच, याची शाश्वती नाही.
-डाॅ. शशिकांत शंभरकर, डीएचओ गडचिराेली