लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : येथील उपविभागीय बांधकाम कार्यालयात आझाद समाज पक्षाचे पदाधिकारी शुक्रवारी दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान एक तक्रार घेऊन गेले कार्यालयात कर्मचारी असता, एकही आणि अधिकारीसुद्धा उपस्थित नव्हते. संपूर्ण कार्यालय शिपायाच्या भरवशावर सोडून कर्मचारी भर दुपारीच गायब झाले. वेळ संपण्याआधीच कार्यालय सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केली आहे.
बहुतांश कार्यालयातील कर्मचारी भर दुपारीच घरचा रस्ता धरतात. ही पहिली वेळ नसून असे अनेकदा आढळले आहे. शुक्रवारी वीकेंड असल्याने धानोरा बांधकाम कार्यालय शिपायाच्या भरवशावर सोडून येथील कर्मचारी दुपारीच गायब झाले, तर उपविभागीय बांधकाम विभाग अभियंता शुक्रवारी कार्यालयात आलेच नसल्याची माहिती मिळाली. इतर कर्मचारी कुठे गेले असल्याचे विचारताच याबाबत मला काहीच माहीत नाही, असे शिपायाने सांगितले. आताच एक कर्मचारी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. त्याला फोन केल्यानंतर कर्मचारी दौऱ्यावर असल्याचे सांगितले.
हलचल पंजी दाखविण्यास टाळाटाळदौऱ्याबाबतची हलचल पंजी मागविली असता शिपायाने टाळाटाळ केली. याचाच अर्थ कर्मचारी मनमानी करून प्रशासकीय कामकाजाच्या वेळी शिपायाच्या भरवशावर कार्यालय सोडून बाहेर निघून जातात. अशा बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केली आहे.