शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस करणार जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर दावा

By admin | Updated: September 16, 2014 23:42 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेत १३ सदस्य असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत निर्णायक भूमिका राहणार आहे. काँग्रेसच्या समर्थनाशिवाय कोणत्याही गटाचे

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत १३ सदस्य असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत निर्णायक भूमिका राहणार आहे. काँग्रेसच्या समर्थनाशिवाय कोणत्याही गटाचे सत्तेचे समिकरण जुळणे कठीण असल्याने काँग्रेसचे महत्व वाढलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने २० सप्टेंबर रोजी पक्ष निरिक्षक म्हणून विधान परिषद सदस्य आमदार हरिभाऊ राठोड यांची नियुक्ती केली आहे व आमदार राठोड हे गडचिरोली येऊन पक्षाच्या सदस्यांशी चर्चा करणार आहे. काँग्रेस अध्यक्ष पदावर आपला दावा ठेवणार असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हसनअली गिलानी यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना सांगितले. गडचिरोली जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १३ सदस्य आहेत. मल्लेलवार सध्या कारागृहात असल्याने ते रजेवर आहेत. त्यामुळे १२ सदस्य प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी होतील. विद्यमान स्थितीत काँग्रेसच्या पाच सदस्यांना अन्य राजकीय पक्षाच्या लोकांनी पर्यटनासाठी नेलेले आहे. सात सदस्यांचा गट सध्या मजबूतपणे उभा आहे. काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी स्थानिक गटातटाचा विचार न करता पक्षहित लक्षात घेऊन या निवडणुकीत मतदान करायचा, असा निश्चय केला आहे व काँग्रेस अध्यक्ष पदावर आपला दावा सांगणार आहे. काँग्रेसकडे अध्यक्ष पदासाठी जीवनपाटील नाट, लंकेश भोयर, पुनम गुरनुले व सरिता भोयर या जिल्हा परिषद सदस्य ओबीसी प्रवर्गातून दावेदार आहेत. स्थानिक गटातटाचा विचार केला तर या नावांना विरोध होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन आपण सारे काँग्रेसचे पाईक आहोत. ही भूमिका पक्षाच्या सातही सदस्यांनी घेतली आहे, अशी सुत्रांची माहिती आहे. अध्यक्ष पद जो देईल त्यालाच समर्थन द्यायचे, असा निर्णय हे सदस्य घेण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असल्यामुळे नेमक्या कोणत्या गटाशी हातमिळवणी करायची यावरही निरिक्षक या सदस्यांची मते जाणून घेणार आहे. गेल्या अडीच वर्षात सत्तेवर असलेल्या राकाँच्या अध्यक्षांनी आपल्याला उपेक्षची वागणूक दिली. ही भावना या सर्वांमध्ये प्रकर्षाने जाणवू लागली असून काँग्रेसच्या भूमिकेवर अनेकांचे लक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस सदस्यांचे महत्व आता वाढले आहे. निरिक्षक या संदर्भात अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती जिल्हास्तरावरील पदाधिकाऱ्यांनाी दिली आहे.