शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांना ग्रा. प. सेवेत सामावून घ्या

By admin | Updated: October 22, 2014 23:18 IST

अहेरी उपविभागातील सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड तालुक्यातील ग्रा. प. अंतर्गत मागील तीन वर्षापासून संगणक परिचालक पदावर जिल्हा परिषदेतर्फे ८ हजार ८०० मासिक वेतनावर परिचालकाची

अहेरी : अहेरी उपविभागातील सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड तालुक्यातील ग्रा. प. अंतर्गत मागील तीन वर्षापासून संगणक परिचालक पदावर जिल्हा परिषदेतर्फे ८ हजार ८०० मासिक वेतनावर परिचालकाची नियुक्ती करण्यात आली. परंतु संगणक परिचालकांना अत्यल्प वेतन मिळत असल्याने संगणक परिचालकांना ग्रामपंचायत सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी अहेरी उपविभागातील संगणक परिचालकांनी केली आहे. तीन वर्षापूर्वी महाआॅनलाइन कंपनीमार्फेत संगणक परिचालकांनी कंत्राटी पद्धतीने संगणक परिचालक म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात काम देण्यात आले. संगणक परिचालकांना प्रत्यक्षात मात्र ३ हजार ८०० ते ४ हजार १०० रूपयांपर्यत पगार दिला जात आहे. संगणक परिचालकांंच्या कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत असल्याने कामाच्या तुलनेत पगार अत्यल्प आहे. ८ हजार ८०० रूपये मिळतील या आशेने अनेक युवकांनी कंत्राटी पद्धतीची नोकरी स्वीकारली. परंतु संगणक परिचालकांना ४ हजार रूपयांपर्यंतच वेतन दिले जात आहे. महाआॅनलाइन कंपनीमार्फत माहे जुलैपासून प्रत्येक महिन्याला ४५० डाटाएन्ट्री करणे अनिवार्य केले. परंतु अहेरी तालुक्यातील प्रत्येक ग्रा. प. ची लोकसंख्या १ हजार ते ३०० च्या घरात असल्याने दर महिन्याला ४५० नोंदी उपलब्ध होऊ शकत नाही. नोंदीनुसार आॅपरेटरांना वेतन मिळेल अशी ग्वाही देण्यात आली होती. परंतु आॅगस्ट २०१४ मध्ये प्रत्येक संगणक परिचालकांना २ हजार ५०० प्रमाणे मासिक वेतन देण्यात आले. त्यामुळे संगणक परिचालकांवर अन्याय होत आहे. सुरूवातीस पदावर रूजू होतांना जनगणनेच्या कामाकरीता दर व्यक्ती २१ रूपये प्रमाणे मोबदला देण्याचे मान्य केले होते. परंतु याचा फायदा परिचालकांना देण्यात आला नाही. प्रशासनाने संगणक परिचालकांना मासिक ८ हजार ८०० रूपये प्रमाणे वेतन द्यावे किंवा ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून १०० टक्के सेवेत सामावून घ्यावे, अन्यथा संगणक परिचालकांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विलास दुर्गे, दिनेश आत्राम, भैय्याजी दब्बा, विनोद सदनपवार, मृणालीनी खोब्रागडे, सत्यनारायण दहागावकर, भाग्यश्री दोंतुलवार, श्रृती मोनकुरवार, मनेश वाघाडे, शंकर गोगले, पूजा चक्रमवार, प्रभाकर दुर्गे यांनी केली आहे.