कोंबड्यांची कुश्ती रंगली, ९२ जण आरोपी ! पोलिसांच्या धडक कारवाईत ठाण्यात जागाही पडली अपुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:48 IST2025-09-23T15:47:35+5:302025-09-23T15:48:58+5:30
१४ कोंबडे जप्त : ४४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, गरंजी टोला येथे मोठी कारवाई

Cockfighting incident, 92 accused! Police crackdown leaves police station without enough space
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गरंजी टोलाच्या घनदाट २१ जंगलात अवैध कोंबडा बाजार भरवून जुगार खेळणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी सप्टेंबर रोजी कारवाई केली. यावेळी ९२ जणांना ताब्यात घेतले. १४ कोंबडांसह तब्बल ४४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकाने २१ सप्टेंबरला धाट टाली. यावेळी काही आरोपींनी जंगलात पळ काढला, मात्र पोलिसांनी प्रभावी पद्धतीने सर्व आरोपी ताब्यात घेतले.
९२ जणांवर क्रूरतेने वागणूक देण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १०६० अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सर्व आरोपींना ठाण्यात आणले तेव्हा जागा अपुरी पडली होती. तपास पोउपनिरीक्षक कुणाल इंगळे करीत आहेत.
वाहने, ३१ ५१ मोबाइल जप्त
या कारवाईत एकूण ९२ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण ४४ लाख २६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात ४६ दुचाकी, ५ चारचाकी वाहने, ३१ मोबाइल, १४ कोंबडे, ५ लोखंडी कातीचा समावेश आहे.