शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गावातील अवैध दारूविक्री बंद करा

By admin | Updated: September 20, 2014 23:51 IST

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. येथे तंमुस अध्यक्ष पुंडलिक भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित तंटामुक्त गाव समितीची सभा गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर गाजली.

कुनघाडा : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. येथे तंमुस अध्यक्ष पुंडलिक भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित तंटामुक्त गाव समितीची सभा गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर गाजली. यावेळी उपस्थित युवकांनी गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद करावी, अशी मागणी लावून धरली.१५ आॅगस्ट रोजी गठित करण्यात आलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या सभेत विषयानुसार तीन तंट्यांचा निपटारा करण्यात आला. ४ तंटे शेती व घराच्या जागेविषयी असून चार तंट्याचे मोका चौकशी करण्याचे समितीच्या सभेमध्ये ठरविण्यात आले. अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयानुसार तंमुसचे सदस्य सुधाकर वासेकर, उमेश गझलपल्लीवार, तेजस सातपुते, मंगेश वासेकर, प्रविण झोडे आदी सदस्यांनी गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीचा मुद्दा उपस्थित केला.बीट जमादार यांची बदली करण्यात यावी, दारू विक्रेत्यांना अवैध दारूविक्री बंद करण्याबाबत नोटीस पाठविण्यात यावेत, दारूविक्री बंद न झाल्यास पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करून अवैध दारूविक्री बंद करण्याचे ठरविण्यात आले. गावातील युवक वर्गांनीसुद्धा अवैध दारूविक्रीप्रती रोष व्यक्त करीत असल्यामुळे तंमुस पदाधिकाऱ्यांसमोर दारूबंदीचे आव्हान पेलण्याचे आवाहन केले. दारूबंदी मोहिमेत सहभाग दर्शविण्याची हमी दिली. तंटामुक्त समितीची सभा इतर विषय सोडून अवैध दारूविक्रीच्या मुद्यावर गाजली. सभेला सरपंच अल्का धोडरे, निमंत्रक दिलीप श्रृंगारपवार, भाऊजी कुकडे, अविनाश चलाख, उमेश कुकडे, बंडु वडेट्टीवार, संतोष गव्हारे, मंगेश वासेकर, सुधाकर वासेकर, तेजस सातपुते, शशीकला कोठारे, तलाठी भरडकर, उमेश गझलपल्लीवार तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)