शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्लीत बंद, चक्काजाम, मोर्चा

By admin | Updated: January 18, 2016 01:22 IST

पोटच्या गोळयाचा मृत्यू झाल्यानंतरही आरोग्य विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करुन न दिल्याने आई-वडिलांना मृत बालकास चक्क सात किलोमीटर ....

आदिवासी बालकाचे मृत्यू प्रकरण : दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणीएटापल्ली : पोटच्या गोळयाचा मृत्यू झाल्यानंतरही आरोग्य विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करुन न दिल्याने आई-वडिलांना मृत बालकास चक्क सात किलोमीटर खांद्यावर घेऊन जावे लागल्याच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ तालुका काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी रविवारी एटापल्लीत कडकडीत बंद पाळून धरणे व चक्काजाम आंदोलन केले. तसेच एटापल्लीच्या ग्रामीण रूग्णालयावर मोर्चा धडकला.१३ जानेवारीला एटापल्ली तालुक्यातील तुमरगुडा येथील तोंदे मुरा पोटावी या गरीब आदिवासी इसमाचा संदीप नामक दहा वर्षीय एकुलता एक मुलगा एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात मृत्युमुखी पडला. त्यानंतर आरोग्य विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करुन न दिल्याने तोंदे पोटावी याने चक्क मृतदेह खांद्यावर घेऊन हंबरडा फोडत आपले गाव गाठले. या बाबतच्या बातम्या वृत्तपत्रात झळकताच आधी गडचिरोली येथील निवासी वैद्यकीय अधिकारी व त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकास चौकशीसाठी पाठविले. मात्र समाधान न झाल्याने रविवारी नागरिकांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एटापल्ली बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून घटनेचा निषेध केला. त्यानंतर चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे बराच वेळपर्यंत वाहतूक ठप्प होती. नागरिकांनी मोर्चा नेऊन ग्रामीण रुग्णालयापुढे धरणेही दिले. संदीप पोटावीच्या मृत्यू प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी, रिक्त पदे तत्काळ भरावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय चरडुके, नगर पंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार, नगर पंचायत सदस्य तानाजी दुर्वा, किशन हिचामी, ज्ञानेश्वर रामटेके, माजी पंचायत समिती सदस्य रैनेंद्र येमला यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. (तालुका प्रतिनिधी)