शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक नसताना कुंभीटोल्याचे नागरिक करणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:31 IST

कुरखेडा : गावात निवडणूक नसली तरी दुसऱ्या गावातील मतदार यादीत नाव गेल्याने कुंभीटोला येथील २५ ते ३० मतदार मतदानाचा ...

कुरखेडा : गावात निवडणूक नसली तरी दुसऱ्या गावातील मतदार यादीत नाव गेल्याने कुंभीटोला येथील २५ ते ३० मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील. हा प्रताप तालुका निवडणूक यंत्रणेच्या चुकीमुळे घडणार आहे. ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला ही बाब उघडकीस आल्यामुळे प्रशासनही हतबल झाले असून, ‘त्या’ मतदारांना मतदान करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कुरखेडा तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींपैकी ४३ ग्रामपंचायतींमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. ज्या दोन गावांमध्ये निवडणूक नाही त्यात कुंभीटोला आणि नवेझरी या ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पुढील दोन वर्षांनी संपणार आहे. मात्र, असे असताना चिखली ग्रामपंचायतीच्या चिचटोला प्रभागाच्या मतदार यादीत कुंभीटोला येथील २५पेक्षा जास्त ग्रामस्थांची नावे समाविष्ट केली आहेत. मतदार यादीतील नावांचा शोध घेत काही उमेदवार प्रचाराच्या निमित्ताने त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर या मतदारांना ही बाब समजली. आमच्या गावात निवडणूक नसताना आमचे मतदार यादीत नाव कसे? असा प्रश्न करत त्यांनी आश्चर्य व्यक्त केल्यानंतर निवडणूक विभागाचा हा सावळागोंधळ समोर आला.

(बॉक्स)

यादी अद्यावतीकरणात हलगर्जीपणा

ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय मतदार यादी अद्ययावत करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेतील संबंधित कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात येते. हे करताना संबंधित कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा गोंधळ झाला असण्याची शक्यता आहे. चिखली ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या चिचटोला या गावातील काही मतदार लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कुंभीटोला बुथवर येत असतात. त्यामुळे ग्रामपंचायतीची मतदार यादी तयार करताना प्रत्यक्ष गावात जाऊन आढावा न घेता, टेबलवर बसूनच यादी तयार केल्याने हा गोंधळ उडाला असण्याची शक्यता आहे. अशास्थितीत आता कुंभीटोल्यातील ‘ते’ ग्रामस्थ चिखली गावासाठी मतदानाचा हक्क बजावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(कोट)

डिसेंबर महिन्यात ग्रामपंचायतीच्या मतदार याद्या प्रकाशित झाल्या. मतदार यादीवर आक्षेप घेण्याकरिता काही दिवसांचा वेळ दिला होता. परंतु, कुणीही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे आता मतदार यादीत नाव असल्याने त्या मतदारांना मतदान करता येईल.

- आर. बी. चकोले

नायब तहसीलदार (निवडणूक), कुरखेडा