शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सिनेस्टाईल गाड्या चालविणाऱ्या युवकांना नागरिकांचा चोप

By admin | Updated: April 6, 2017 01:26 IST

गडचिरोली शहरातून दुचाकी घेऊन जाऊन सायंकाळच्या सुमारास माडेतुकूम ते सालईटोला गावादरम्यान सिनेस्टाईल गाडी चालवून

दहा जणांवर गुन्हे दाखल : माडेतुकूम येथील घटना गडचिरोली : गडचिरोली शहरातून दुचाकी घेऊन जाऊन सायंकाळच्या सुमारास माडेतुकूम ते सालईटोला गावादरम्यान सिनेस्टाईल गाडी चालवून लोकांना पट्ट्याच्या सहाय्याने मारहाण करणाऱ्या पाच युवकांना माडेतुकूम व सालईटोलाच्या नागरिकांनी जबर चोप दिल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजता घडली. या प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी दोन्ही गावातील दहा नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील एका युवकाला जबर मारहाण झाल्याने त्याला नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. डेनिस सुधाकर उईके (१६) रा. कुरखेडा, मांतेश वसंतराव कोडापे (१५) रा. साईनगर, गडचिरोली, निंकूज प्रेमेंद्र सहारे (१६) रा. साईनगर, गडचिरोली, दिग्गज प्रकाश लोनबले (१६) रा. रामनगर, गडचिरोली, तारीक अनवर हिदायत खान (१६) रा. स्नेहनगर, गडचिरोली अशी मारहाणीत जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत. डेनिस हा गंभीर जखमी झाल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले. हे पाचही युवक मागील १५ दिवसांपासून सालईटोला ते माडेतुकूम दरम्यान सायंकाळच्या सुमारास भरधाव वेगाने दुचाकी चालवित होते. भरधाव वेगामुळे अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे सालईटोला व माडेतुकूम येथील नागरिकांनी या युवकांना भरधाव वेगाने दुचाकी न चालविण्याची समज दिली. मात्र ते मानण्यास तयार नव्हते. त्यामुळे दोन्ही गावातील नागरिकांनी मिळून मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पाचही युवकांना चांगलाच चोप दिला. या प्रकरणाची तक्रार हिदायत खान यांनी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यानंतर पोलिसांनी गावकरी पंकज प्रकाश गेडाम, प्रकाश खोब्रागडे, मेहराव भुरले, दिनेश वलादे, महेश भुरले, प्रकाश लटारे, श्रावण मेश्राम, भास्कर मोहुर्ले, धनराज नांदेकर, चंद्रकांत जुआरे या दहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील पंकज गेडाम व धनराज नांदेकर या दोघांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांचा पीसीआर सुनावला.