शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

दीडशेवर नागरिकांची आरोग्य तपासणी

By admin | Updated: April 26, 2017 01:09 IST

गडचिरोली जिल्हा पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील

मुक्तापुरात जनजागरण मेळावा : शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे व सातबाराचे वितरण अहेरी : गडचिरोली जिल्हा पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील मुक्तापूर (महागाव) येथे मंगळवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यादरम्यान झालेल्या आरोग्य शिबिरात दुर्गम भागातील जवळपास दीडशेवर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे होते. प्रमुख अतिथी म्हणून अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग, भूमिअभिलेख कार्यालयाचे संतोष तिरेले, पशुवैैद्यकीय अधिकारी शिंदे, वैैद्यकीय अधिकारी बिश्वास, वनरक्षक घुटे, तलाठी पठाण, ग्रामसेविका भैसारे, प्रकाश दुर्गे, दीपक सुनतकर, कृषी सहायक नंदेश्वर, पोलीस पाटील चंद्रकला कोडापे, सरपंच रमेश मडावी, श्रीहरी आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात महसूल, कृषी, आरोग्य, आदिवासी विकास विभाग, वन विभाग, शिक्षण, पशुसंवर्धन, भूमिअभिलेख विभागाच्या वतीने स्टॉल लावून अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. सदर मेळाव्यात मुक्तापूर, महागाव, इतलचेरू या गावातील काही शेतकऱ्यांना वनहक्क जमिनीचे पट्टे व सातबाराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी रांगोळी, मॅराथॉन, चित्रकला, नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना पोलीस प्रशासनातर्फे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मुक्तापूर येथील ग्रामस्थांना दैनंदिन जीवनापयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. मोबाईल पॅथॉलॉजी युनिट अहेरी व प्राथमिक आरोग्य केंद्र महागावतर्फे सिकलसेल, बीपी व मधुमेह तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपमा बिश्वास, दीप्ती कोहळे, ललीता उसेंडी, सुनीता पुंघाटी, महागाव पीएचसीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता गजाटेड्डीवार, सिंधू रायसिडाम यांनी सेवा दिली. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक संजय मोरे, संचालन पोलीस उपनिरीक्षक कुणाल दुरड यांनी केले तर आभार संतोष पवार यांनी मानले. (प्रतिनिधी)