शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सुद्धागुडम येथे विद्युत प्रवाह साेडून चितळाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST

जिमलगट्टा : अहेरी तालुक्याच्या सुद्धागुडम येथे रविवार ३ जानेवारीला शेतात विद्युत प्रवाह लावून चितळाची शिकार करण्यात आली. याबाबत माहिती ...

जिमलगट्टा : अहेरी तालुक्याच्या सुद्धागुडम येथे रविवार ३ जानेवारीला शेतात विद्युत प्रवाह लावून चितळाची शिकार करण्यात आली. याबाबत माहिती मिळताच दाेन आराेपींना शिजलेल्या मटनासह अटक करण्यात आली. मात्र या घटनेतील तीन आराेपी अद्यापही फरार आहेत. सुद्धागुडम येथे ३ जानेवारीला दुपारी २.३० वाजता गावातील रामुलू व्यंकटी भेडकी (६०) यांच्या घरी वन्य प्राण्याचे मांस असल्याची माहिती गाेपनीय सूत्राकडून वन कर्मचाऱ्यांना मिळाली. या माहितीवरून त्याच दिवशी दुपारी ३ वाजता गावात धाड टाकून तपासणी केली असता, शिजविलेले १.४०४ किलाे व ८.९७२ किलाे कच्चे मांस वन कर्मचाऱ्यांना मिळाले. या संदर्भात आराेपींची सखाेल चाैकशी केली असता, व्यंकटस्वामी रामुलू भेडकी (२९) व त्याचा जावई सुमित मेश्राम भामरागड यांनी २ जानेवारी सायंकाळी शेतात विद्युत तारांवर आकडा टाकून विद्युत प्रवाह साेडला. त्याच दिवशीच्या रात्री चितळ अडकले. ३ जानेवारीला सकाळी शिकार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पाच जणांनी शेतामध्येच चितळाला कापून त्याचे मांस खाण्याकरिता आपल्या घरी आणले. चितळाचे काही अवशेष व कातडी शेतातच लपवून ठेवले, अशी माहिती अटक केलेल्या दाेन्ही आराेपींनी दिली. जप्त केलेला मांस व कातडीवरून चितळ हे वन्यप्राणी असून शेड्युल्ड ३ तृणभक्ष्यी असल्याचे आढळून आल्याने आराेपींविराेधात भारतीय वन्यजीव संरक्षण अभिनियमांतर्गत गुन्हा नाेंदविण्यात आला. ४ जानेवारीला दाेन आराेपींना ताब्यात घेण्यात आले. मात्र तीन आराेपी अद्यापही फरार आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास एसीएफ प्रवीणकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्राधिकारी नगराळे करीत आहेत.