शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

चायनीज वस्तूंनी बाजारपेठ व्यापली

By admin | Updated: October 22, 2014 23:18 IST

चायनाच्या वस्तूंनी संपुर्ण भारतीय बाजारपेठ काबीज केली असून यापासून दीपोत्सवाच्या वस्तूही सुटल्या नाहीत. गडचिरोलीच्या बाजारात मेड इन चायना लिहिलेल्या वस्तूंनी गर्दी केली आहे.

गडचिरोली : चायनाच्या वस्तूंनी संपुर्ण भारतीय बाजारपेठ काबीज केली असून यापासून दीपोत्सवाच्या वस्तूही सुटल्या नाहीत. गडचिरोलीच्या बाजारात मेड इन चायना लिहिलेल्या वस्तूंनी गर्दी केली आहे.दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानल्या जातो. या सना निमित्त प्रत्येक नागरिक आपापाल्यापरिने जास्तीत जास्त वस्तूंची खरेदी करतात. या सनाला विविध वस्तूंची खरेदी केली जात असल्याने दुकानदार एका महिन्यापूर्वीच माल आणून ठेवतात. या सणासाठी कपडे, गोड पदार्थ, फराळ, फटाके, रांगोळी, पणत्या, लायटिंगच्या माळा या सारख्या अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. चायनीज वस्तू टिकावू नसल्या तरी स्वस्त मात्र मस्त राहत असल्याने चायनाच्या वस्तू भारतीय ग्राहकांच्या नेहमीच पसंतीस उतरल्या आहेत. दिवाळीच्या सनाच्या निमित्ताने हजारो कोटीची उलाढाल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर चायनीज कंपण्यांनी दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणात बनविण्यास सुरूवात केली आहे. या वस्तू उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून बनविल्या जात असल्याने दिसण्यासाठी अत्यंत आकर्षक असतात व भारतीय कंपन्यांच्या उत्पादनाच्या तुलनेत या वस्तू स्वस्त राहत असल्याने या वस्तुकडे ग्राहक नेहमीच आकर्षित होतात. यावर्षी बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक पणत्या, आकाश दिवे, प्लॉवर पॉट, झुंबर, खेळण्याच्या बंदूक, म्युझीक असलेल्या बंदूक, एवढेच नाही तर फटाकेही चायनीज कंपन्यांचे असल्याचे दिसून येते. भारतीय वस्तूंच्या तुलनेत चायनाच्या वस्तूंची किंमत अर्धी असल्याचे दिसून येते.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नुकताच नारा दिला आहे. ज्या प्रमाणे जपान, अमेरिका व चायनाच्या वस्तूंनी संपूर्ण जग व्यापले आहे. त्याचप्रमाणे भारतीय मालाचीही निर्यात झाली पाहिजे असे आवाहनही केले होते. मात्र टाचणीपासून ते मोठमोठ्या वस्तूंनी भारतीय बाजारपेठ व्यापायला लागली आहे. महत्वाचे म्हणजे या वस्तू ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.पंतप्रधानानी दिलेला नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी भारताला चीन प्रमाणेच अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पादन करावे, लागेल. तेव्हाच या चायनीज वस्तूंना शह देऊन बाजारपेठेवर भारतीय वस्तूंचा कब्जा करणे शक्य होणार आहे. चायनाच्या कंपन्या येथील संस्कृतीचा निट अभ्यास करून ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा वस्तू तयार करीत असल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)