कामांची वेळोवेळी तपासणी करा

By Admin | Updated: August 18, 2016 01:40 IST2016-08-18T01:40:51+5:302016-08-18T01:40:51+5:30

तालुक्यातील कुशल-अकुशल कामाबद्दल तसेच कामाच्या दर्जाबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी व तपासणी करावी,

Check things from time to time | कामांची वेळोवेळी तपासणी करा

कामांची वेळोवेळी तपासणी करा

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : आरमोरी तहसील कार्यालयाला भेट
आरमोरी : तालुक्यातील कुशल-अकुशल कामाबद्दल तसेच कामाच्या दर्जाबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी व तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी आरमोरी तहसील कार्यालयाला मंगळवारी दिलेल्या भेटीत अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी तहसील कार्यालयाला आकस्मिक भेट देऊन विभाग प्रमुखांकडून विविध योजनांच्या कामाचा आढावा घेतला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पंचायत व यंत्रणा स्तरावरील २०१६-१७ या वर्षातील कामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. शासकीय जमीन मागणीबाबत आढावा व मंजुरीसाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश नायक यांनी दिले. आरमोरी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणीही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावेळी तहसीलदार मनोहर वलथरे, संवर्ग विकास अधिकारी ए. डी. सजनपवार, कासवीचे उपसरपंच प्रवीण रहाटे, विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. (वार्ताहर)

 

Web Title: Check things from time to time