शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

वीज मीटरमध्ये फेरफार; फाैजदारी गुन्हा अन् दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 05:00 IST

मीटरमधील फेरफार महावितरणच्या निदर्शनास आल्यास तात्पुरती दंडाची रक्कम भरण्याचे आदेश संबंधित ग्राहकाला नोटीस काढून दिले जातात. ग्राहकाला जर ही रक्कम मान्य असेल तर ती भरण्यास सात दिवसांची मुदत दिली जाते, परंतु यात रकमेबद्दल काही आक्षेप असतील तर तो ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांसमोर आक्षेप मांडू शकतो. ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच दंडाच्या रकमेसंबंधीचा अंतिम आदेश अधिकारी देतात.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या वीज ग्राहकांना मोठ्या आर्थिक भुर्दंडासह अंधारात राहण्याची शिक्षा भोगावी लागते. चोरी केलेल्या विजेपेक्षा पाचपट अधिक रक्कम दंड भरण्यासह शिक्षादेखील होऊ शकते. वीज मीटरमध्ये फेरफार केल्याची गेल्या वर्षभरात जवळपास ५० प्रकरणे आढळली आहेत. त्यांच्यावर लाखाे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे आणि तो वसूलही केला आहे.वीज कलम कायदा १२६ नुसार वीजचोरीसाठी जी कारवाई होते तीच मीटर फेरफार केल्यानंतर होते. ‘महावितरण’चे भरारी पथक कधीही येऊन मीटर तपासणी करू शकतात, याचसाठी विजेचे मीटर घरात न ठेवता बाहेर, दर्शनी बाजूला लावावे असे धोरण आहे. 

दंडाची रक्कम भरण्यासाठी मुदतमीटरमधील फेरफार महावितरणच्या निदर्शनास आल्यास तात्पुरती दंडाची रक्कम भरण्याचे आदेश संबंधित ग्राहकाला नोटीस काढून दिले जातात. ग्राहकाला जर ही रक्कम मान्य असेल तर ती भरण्यास सात दिवसांची मुदत दिली जाते, परंतु यात रकमेबद्दल काही आक्षेप असतील तर तो ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांसमोर आक्षेप मांडू शकतो. ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच दंडाच्या रकमेसंबंधीचा अंतिम आदेश अधिकारी देतात. हा आदेश देण्यासाठीही त्यांना तीन दिवसांचे बंधन घालण्यात आले आहे.

वीजचोरीसाठी अशीही चलाखीमहावितरणला आपण बिल देतोय म्हटल्यावर ती आपली मालकी आहे, असा ग्राहकांचा समज असतो पण विजेच्या वायरमध्ये देखील काही फेरफार करायचा म्हटला तर तो ‘महावितरण’ला कळवावा लागतो. मीटरला तर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही हात लावू शकत नाही, पण तरीदेखील मीटरमधील वायरीत फेरफार करण्यासाठी चुंबक आणि नाण्याचा वापर करून वीजमीटरचा वेग नियंत्रित केला जातो. त्यातून महावितरणची फसवणूक केली जाते. काही वीज चाेरटे तर रिमाेटच वापरत असल्याचे आढळून आले आहे. 

मीटर जप्ती आणि आर्थिक दंडहीमीटरमध्ये फेरफार केल्याचे तपासणी दरम्यान आढळून आल्यास महावितरणकडून कठोर कारवाई होते. संबंधित ग्राहकाकडे असणारी वीज उपकरणे, त्याचा सरासरी वापर हे पाहून त्याच्या चार ते पाचपट दंडाची आकारणी होते शिवाय वीज चोरी केल्याबद्दल गुन्हाही दाखल केला जातो. तपास हाेऊन दंड भरेपर्यंत वीजपुरवठा खंडित केला जाते. त्यामुळे ताेपर्यंत अंधारातच राहावे लागते. 

 

टॅग्स :electricityवीज