शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी साखळी उपोषण

By admin | Updated: October 3, 2015 01:25 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड कार्यालयांतर्गत येत असलेल्या अनुदानित आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन मागील चार महिन्यांपासून देण्यात आले नाही.

भामरागड प्रकल्प : अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांचा सहभागभामरागड : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड कार्यालयांतर्गत येत असलेल्या अनुदानित आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन मागील चार महिन्यांपासून देण्यात आले नाही. प्रकल्प कार्यालयाच्या दफ्तर दिरंगाईच्या विरोधात आश्रमशाळा कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला असून महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. अनुदानित आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन चार महिन्यांपासून झाले नाही. वेतनाबाबत वेळोवेळी अर्ज विनंत्या करण्यात आल्या. मात्र वेतन काढण्यासंदर्भात प्रकल्प कार्यालयाने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे कर्मचारीवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. प्रकल्प अधिकारी वेतनाची तारीख निश्चित करून लेखी स्वरूपात माहिती देणार नाही, तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. ३ आॅक्टोबर रोजी प्रकल्प अधिकारी व लेखापाल प्रत्यक्ष उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत वेतनाबाबत चर्चा करतील, अशी आशा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. साखळी उपोषणाला मुख्याध्यापक महादेव बासनवार, डॉ. विलास तळवेकर, शाईन अल्ली सय्यद, गोटे, दिलीप मांगलेकर, सेलोकर, वानखेडे, झोडे, ठावरी, चतूर, कसारे, मुलकलवार, झाडे, निनावे, उरकुडे, सूरजागडे, गुट्टेवार, आत्राम, जलील शेख, गेडाम, धानोरकर, दुधबळे, कापसे, दोनाडकर, शेख, पवार आदी कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)