भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील मुरखळा माल येथे वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने संत तुकोबाराय जयंती विठ्ठल आश्रमात साजरी करण्यात आली. मुरखळा माल येथे भागवत सप्ताह १० फेब्रुवारीपासून सुरू आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेनंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी धनराज नागापुरे महाराज, बोंडकू बुरे, मुरलीधर मंगर, हरी शेंडे,पत्रू कुथे, मनोहर देशमुख, संजय गटलेवार, बंडू गव्हारे, ढिवरू बोदलकर, पत्रू महामंडरे, तुळशीराम राऊत, विलास घोगरे, गोविंदा बुरांडे, जनार्दन तुंबडे, राजू नैताम, आत्माराम बुरे, बोंडकू बुरांडे, ईश्वर संदोकर, पुष्पा नागापुरे, कौशल्या ढोंगे, माया लाड, लीला खडसे, तारा मुमडवार, प्रियंका सोमनकर, माया बुरे, चंद्रकला शेंडे, सुचिता डांगे, संगीता डांगे, नलू घोगरे, योगिता मोहुर्ले, निर्मला बोदलकर, अनू वासेकर, लता वासेकर, खुशाली नागापुरे तसेच भाविक उपस्थित होते. संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे कळस आहेत, असे प्रतिपादन नागापुरे महाराजांनी केले.
संत तुकोबाराय यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:34 IST