शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

बालाजी मंदिरात दीपाेत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST

बालाजी मंदिरासमाेर आकर्षक रांगाेळी काढण्यात आली हाेती. ही रांगाेळी भाविकांचे लक्ष वेधून घेत हाेती. दीपाली रावत, गायत्री रावत या ...

बालाजी मंदिरासमाेर आकर्षक रांगाेळी काढण्यात आली हाेती. ही रांगाेळी भाविकांचे लक्ष वेधून घेत हाेती. दीपाली रावत, गायत्री रावत या बहिणींनी रांगाेळी साकारून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला हाेता. विशेष म्हणजे धनुर्मासनिमित्त दरराेज सकाळी ५.३० ते सकाळी ६ वाजेपर्यंत भजन, आरती, गाेविंद नामावली, हनुमान चालिसा, संकट माेचन हनुमान अष्टकाचे सामुहिक पठण तसेच महिला भाविकांकडून श्री विष्णू सहस्त्र नामावलीचे पठण दरराेज केले जात हाेते. वैकुंठ एकादशीच्या दिवशी उत्तरद्वार दर्शनम् व संध्याकाळी विष्णूचे वाहन गरूडाची शाेभायात्रा काढण्यात आली हाेती. दरराेज पूजाअर्चा, आरती तसेच तीर्थ प्रसादाचे वितरण करण्यात येत आहे. धनुर्मासाची समाप्ती १३ जानेवारीला भाेगीच्या दिवशी हाेणार आहे. या निमित्ताने व्यंकटेश्वर व गाेदादेवी कल्याण महाेत्सव हाेणार आहे. तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या महाेत्सवाला भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

दरवर्षी व्यंकटेश्वर व गाेदादेवी कल्याण महाेत्सवाला भाविकांची माेठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. परंतु यावर्षी काेराेनाचे संकट असल्याने भाविकांच्या गर्दीवरही परिणाम हाेण्याची शक्यता आहे. असे असले तरी बालाजी मंदिरात हा महाेत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे.