शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

मेडिगट्टा प्रकल्पाचे काम रद्द करून जनसुनावणी घ्या

By admin | Updated: May 3, 2016 01:51 IST

तेलंगणा सरकारच्या वतीने होणाऱ्या मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील

सिरोंचा : तेलंगणा सरकारच्या वतीने होणाऱ्या मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला कोणताही फायदा होणार नसून उलट २२ गावे बुडीत क्षेत्रात जाणार आहे. त्यामुळे सदर सिंचन प्रकल्पाचे काम तत्काळ रद्द करून या संदर्भात जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थी संघाच्या तालुका शाखा सिरोंचाच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन देऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे केली आहे. दरम्यान तेलंगणा सरकारच्या वतीने सदर सिंचन प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमास आविसंने सोमवारी प्रखर विरोध केला. काळे झेंडे दाखवून दोन्ही राज्याच्या सरकारचा निषेध केला. तहसीलदारांना निवेदन देताना माजी आमदार दीपक आत्राम, जि.प.चे कृषी सभापती अजय कंकडालवार, मंदा शंकर, बानय्या जनगम, रवी सल्लम, उपसरपंच कुमरी सडवल्ली, जानकी सिनू, रवी बोगोनी, लगा सत्यम, गादे सोमय्या, दिलीप गंजीवार, संतोष तलांडे, रवी सुलतान व आविसंचे कार्यकर्ते उपस्थित होते.