पुराच्या पाण्यात कोसळली बस, प्रवाशांना सुखरुप वाचविण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 21:03 IST2018-08-20T20:57:42+5:302018-08-20T21:03:15+5:30
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्व नदी-नाल्यांना पूर आला असताना एका अरुंद पुलावरून एसटी महामंडळाची एशियाड बस नाल्याच्या पाण्यात कोसळली. गावकऱ्यांच्या तत्परतेने या बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर

पुराच्या पाण्यात कोसळली बस, प्रवाशांना सुखरुप वाचविण्यात यश
अहेरी/आलापल्ली (गडचिरोली) : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्व नदी-नाल्यांनापूर आला असताना एका अरुंद पुलावरून एसटी महामंडळाची एशियाड बस नाल्याच्या पाण्यात कोसळली. गावकऱ्यांच्या तत्परतेने या बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नद्यांना पूर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
आलापल्ली-जिमलगट्टा मार्गावरील नंदीगावजवळच्या जिमेला नाल्यावर सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली डेपोची ही बस नेहमीप्रमाणे सकाळी हैदराबादवरून निघाली. दुपारी 3.30 च्या सुमारास ती अहेरीत व नंतर गडचिरोलीत पोहोचते. मात्र, सततच्या पावसामुळे सोमवारी या बसला उशिर झाला. अहेरीला पोहोचण्याआधीच जिमेलाच्या नाल्यावरून थोडे पाणी वाहात असताना चालकाने बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि पुलाचा काही भाग तुटलेला असल्याने ही बस एका बाजुने नाल्यात कोसळली. सुदैवान, ती झाडाला अडली होती. याबाबत माहिती मिळताच काळीपिवळी जीपचे चालक आणि नंदीगावच्या लोकांनी धावपळ करुन लांब दोरखंड आणि ट्रॅक्टरची व्यवस्था केली. त्याच्या सहाय्याने बसमधील 10 ते 25 प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.