शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

३०० रूपयांत मिळणार जळाऊ बिट

By admin | Updated: December 29, 2016 01:19 IST

गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना निस्तार हक्काने जळाऊ लाकूड ५१३ रूपये सवलतीच्या दराने विकल्या

शासनाचा निर्णय : कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्याला यश देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना निस्तार हक्काने जळाऊ लाकूड ५१३ रूपये सवलतीच्या दराने विकल्या जात होते. निस्तार हक्काने अल्पभूधारक, शेतकरी, बीपीएलधारक व्यक्ती व अंत्यसंस्कारासाठी सर्वसामान्य नागरिकांना चढ्यादराने जळाऊ लाकूड घ्यावे लागत असल्याने आर्थिक भार सोसावा लागत होता. या संदर्भात आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी हा प्रश्न विधीमंडळात उपस्थित केला व त्यानंतर सातत्याने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला. याची दखल घेत राज्य सरकारने २७ डिसेंबरला जळाऊ लाकूड बिट ३०० रूपयाला प्रतिबिट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महसूल व वन विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. अतिदुर्गम आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना जिल्हाधिकारी यांच्याकडून जळाऊ लाकडाचा दर मंजूर करण्यात येत होता. मजुरी व वाहतुकीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जळाऊ लाकडाच्या दारात देखील झपाट्याने वाढ झाली. बिटाचे दर कमी केल्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होण्याच्या उद्देशाने वन विभागाची जनसामान्यात प्रतिमा उंचाविण्याच्या दृष्टीने वनालगतच्या गावातील लोकांना परवडेल, अशा दरात शासनाने जळाऊ बिट उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. क्रिष्णा गजबे यांनी राज्याचे वित्त वन, नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्यानंतर आ. गजबे यांनी विधी मंडळात तारांकित प्रश्नही या मुद्यावर उपस्थित केला होता. गजबे यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन राज्य शासनाने जळाऊ बिटाचे दर ३०० रूपये करण्यास मान्यता प्रदान केली आहे. यासंदर्भात राज्याच्या वन विभागाचे सहसचिव प्रकाश महाजन यांनी आदेश काढला आहे. या निर्णयाचा गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना मोठा लाभ होईल, असे आ. गजबे यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)