केव्हाही कोसळू शकतो हा अवजड फलक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 14:05 IST2017-10-27T14:03:57+5:302017-10-27T14:05:26+5:30

केव्हाही कोसळू शकतो हा अवजड फलक!
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली:
देसाईगंज येथून सात किमीवरील गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांनाजोडणाºया अर्जुनी/मोरगाव-गोंदिया पुढे छत्तीसगढ राज्यात जाणाºया रोडवरील गाव तसेच अंतर लिहलेल्या उंच चौकोनी लोखंडी फलक झुकल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली असून फलकाची लवकर दुरु स्ती करण्याची मागणी होत आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील सर्वात लहान तालुका परंतु सर्वात मोठी बाजारपेठ देसाइगंज(वडसा) हे तालुका मुख्यालय अगदी पाच-दहा किमीच्या परिघात पश्चिमेला चंद्रपूर, उत्तरेला भंडारा तर नैऋत्य दिशेला गोंदिया या तीन जिल्ह्यांना जोडणारे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. देसाईगंज वरु न अवघ्या सात किलोमीटर अंतरावर अर्जुनी/कोहमारा-गोंदिया-राजनांदगाव-रायपुर येथे जाणाºया मार्गावर गडचिरोली जिल्ह्याची सीमा आहे. याच ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही कडेला जमिनीत गाडलेल्या उंच लोखंडी खांबांवर डांबरी रोडच्या वर आडवे आयताकृती फलक लावण्यात आले आहे. यावर गावचे नाव व त्याचे किमी मध्ये अंतर लिहले आहे. परंतु मागील काही काळापासून गाव, अंतर लिहलेले आडवे फलक एका बाजूने तुटून उभ्या खांबावर लटकले आहे. त्यामुळे सदर मैलाचे लोखंडी फलक केव्हाही तुटून पडू शकते आणि मोठी जीवित, वित्तहानी होऊ शकते.
हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने दुचाकी, चारचाकी हलके, जड माल तसेच प्रवासी वाहनांची गर्दी असते. याच कारणामुळे डांबरी रस्ता जागोजागी उखडला असून खड्डेही पडले आहेत. गाव, अंतर दर्शक लोखंडी फलक आणि रस्त्याची लवकरात लवकर दुरु स्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.