शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारासाठी आणले अन् मृतदेहच धाडला; कर्नाटकच्या चालकाची आत्महत्या नव्हे हत्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:19 IST

Gadchiroli : मजुरीच्या कामासाठी महाराष्ट्रात आणलेल्या कर्नाटकच्या एका ४० वर्षीय चालकाचा आरमोरी तालुक्यातील टेंभा येथे संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

गडचिरोली  : मजुरीच्या कामासाठी महाराष्ट्रात आणलेल्या कर्नाटकच्या एका ४० वर्षीय चालकाचा आरमोरी तालुक्यातील टेंभा येथे संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंगोद सरकार असे मृताचे नाव असून, ही 'डिहायड्रेशन'मुळे झालेली आत्महत्या नसून नियोजित हत्या असल्याचा खळबळजनक आरोप मृताच्या पत्नीने केला आहे. या प्रकरणी कर्नाटकात शून्यने वाहनमालकावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला, तो १२ मार्च रोजी आरमोरी पोलिसांकडे वर्ग झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील सिंधनूर येथील रहिवासी असलेले अंगोद सरकार हे दीपंकर प्रशांत सरकार याच्याकडे चालक म्हणून कामाला होते. १८ जून २०२५ रोजी दीपंकरने अंगोश यांना आरमोरी तालुक्यातील मजूर आणण्यासाठी सोबत नेले. २१ जून २०२५ रोजी पहाटे अंगोद यांनी पत्नी फुलमती यांना फोन करून, मला आरमोरी तालुक्यातील टेंभा येथील एका व्यक्तीकडे सोडून दीपंकर निघून गेला आहे आणि संबंधित व्यक्ती मला जाऊ देत नाही, अशी आपबिती सांगितली होती. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला.

अंगावरील जखमांनी घातपाताचा संशय

२२ जून २०२५ रोजी अंगोद यांचा मृतदेह शेतात आढळून आला. आरमोरी पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाचा हवाला देत हा मृत्यू शरीरातील पाणी कमी झाल्याने झाल्याचे सांगितले. मात्र, मृताच्या नातेवाईकांनी मृतदेहाचे फोटो आणि व्हिडिओ काढले असता, त्यांच्या पाठीवर, हाता-पायांवर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. जर हा मृत्यू नैसर्गिक होता, तर या जखमा आल्या कुठून? असा संतप्त सवाल पत्नी फुलमती सरकार यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे सुरुवातीला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा निरोप गावी धाडण्यात आला होता. ​न्यायासाठी पत्नीची धडपड

पीडित पत्नीने आता कर्नाटकच्या सिंधनूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आपल्या पतीची हत्या करून पुरावे नष्ट करण्यात आल्याचे म्हटले आहे. आरमोरी पोलिसांनी या प्रकरणाचा आता पुन्हा तपास सुरु केला आहे.

"कर्नाटक पोलिसांकडून गुन्हा तपासकामी वर्ग झाला आहे. त्यानुसार या प्रकरणाचा पुन्हा सखोल तपास केला जाईल. योग्य ते पुरावे व साक्षीदार तपासून तथ्य शोधण्याचा प्रयत्न केला जाईल."- कैलास गवते, पो.नि. आरमोरी ठाणे

English
हिंदी सारांश
Web Title : Driver brought for work found dead; murder suspected, not suicide!

Web Summary : A driver from Karnataka, brought to Maharashtra for work, died suspiciously. His wife alleges murder, not dehydration-induced suicide, citing injuries. Police are reinvestigating the case after a complaint was filed in Karnataka.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली