शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाकाळातही लाचखाेरी जाेरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:00 IST

मागील तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४५ सापळे रचण्यात आले आहेत. त्यात ५९ आराेपींना अटक करण्यात आली आहे. २०१८ मध्ये १६ सापळ्यांमध्ये तेवढ्याच आराेपींना अटक करण्यात आली आहे. यात वर्ग-२ चे ४, वर्ग-३ चे १०, वर्ग-४ चे १ व  इतर लाेकसेवक १ जणाला अटक करण्यात आली आहे. २०१९ मध्ये १४ सापळ्यांमध्ये २० जणांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२०२० मध्ये २३ जणांना केली अटक; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाच्या साथीला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले हाेते. २०२० या वर्षातील बहुतांश दिवस लाॅकडाऊनमध्येच गेले. याचा माेठा फटका उद्याेग, व्यवसाय, मजूर, खासगी कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचारी व सामान्य नागरिकांना बसला. मात्र, याही कालावधीत शासकीय कर्मचाऱ्यांची लाचखाेरी तेजीत हाेती. २०२० या वर्षात एसीबीने १५ सापळे रचून २३ लाचखाेरांना अटक केली आहे. शासकीय काम करून देण्यासाठी लाच मागणे व स्वीकारणे हा गुन्हा आहे. लाच मागणाऱ्या व स्वीकारणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शासनाने स्वतंत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची निर्मिती केली आहे. तक्रारकर्त्याकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर या तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला जातो. एसीबीच्या वतीने नागरिकांमध्येे लाचलुचपत न देण्याविषयी जागृती केली आहे. त्यामुळे एखाद्या शासकीय कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने लाच मागितल्यास त्याची तक्रार एसीबीकडे करण्याचे प्रमाण वाढले असले तरी त्यात पुन्हा वाढ हाेण्याची आवश्यकता आहे.  काेराेनाकाळात अनेकांचा राेजगार गेला, व्यवसाय बुडाला, अनेक कंपन्या पूर्णपणे बुडाल्या; मात्र अशाही स्थितीत पाेलीस व आराेग्य विभागाचे कर्मचारी वगळता इतर शासकीय कर्मचारी व अधिकारी मजा भाेगत हाेते. घरी राहूनही पूर्ण पगार  मिळत हाेता; मात्र अशाही स्थितीत या कर्मचाऱ्यांची लाचेची आस कमी झाली नाही.लाच स्वीकारणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्याला निलंबित किंवा बडतर्फ करण्यासाेबतच त्याला कारावासाची शिक्षा सुनावण्याची गरज निर्माण झाली आहे.

तीन वर्षांमध्ये ४५ सापळे मागील तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४५ सापळे रचण्यात आले आहेत. त्यात ५९ आराेपींना अटक करण्यात आली आहे. २०१८ मध्ये १६ सापळ्यांमध्ये तेवढ्याच आराेपींना अटक करण्यात आली आहे. यात वर्ग-२ चे ४, वर्ग-३ चे १०, वर्ग-४ चे १ व  इतर लाेकसेवक १ जणाला अटक करण्यात आली आहे. २०१९ मध्ये १४ सापळ्यांमध्ये २० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात वर्ग-१ चा १, वर्ग-२ चे २, वर्ग-३ चे ११,  इतर लाेकसेवक २ व खासगी ४ व्यक्तींचा समावेश आहेे. २०२० मध्ये १५ सापळे रचून २३ आराेपींना अटक करण्यात आली. त्यात वर्ग-२ चे ६, वर्ग-३ चे १२, वर्ग-४ चे १, इतर लाेकसेवक २ व दाेन खासगी व्यक्तींचा समावेश आहे.

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण