शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर खनिकर्म अधिकाऱ्यावर अद्याप निलंबनाची कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

आधीपासून वादग्रस्त असणाऱ्या शेळके यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. परंतू कारवाई होत नसल्यामुळे त्यांची हिंमत वाढली होती. त्यातूनच गेल्या ११ नोव्हेंबर रोजी एका रेती कंत्राटदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना त्यांना एसीबीच्या पथकाने पकडले. यासंदर्भातील अहवाल एसीबीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाला.

ठळक मुद्देएसीबीने पाठविला अहवाल : खनिकर्म विभाग घेणार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वत:च्या कार्यालयात बसून बिनधास्तपणे तब्बल १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलेल्या जिल्हा खनिकर्म अधिकारी एस.आर.शेळके यांच्यावर अद्याप त्यांच्या विभागाने निलंबनाची कारवाई केलेली नाही. त्यामुळे खनिकर्म विभाग लाचखोर अधिकाऱ्यांना पाठीशी तर घालत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.आधीपासून वादग्रस्त असणाऱ्या शेळके यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. परंतू कारवाई होत नसल्यामुळे त्यांची हिंमत वाढली होती. त्यातूनच गेल्या ११ नोव्हेंबर रोजी एका रेती कंत्राटदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना त्यांना एसीबीच्या पथकाने पकडले. यासंदर्भातील अहवाल एसीबीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाला. तो अहवाल पुढील कारवाईसाठी खनिकर्म विभागाकडे पाठविण्यात आला असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र शुक्रवारपर्यंत सदर विभागाने शेळके यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती.वास्तविक शेळके यांची आधीच चंद्रपूरला बदली झाली होती. परंतू गडचिरोलीत दुसरे अधिकारी रुजू झाले नसल्यामुळे शेळके यांनी येथील प्रभार सोडला नव्हता. जाता-जाताही लाचखोरी सुरूच असल्यामुळे त्यांना त्याचे फळ मिळाले, अशी भावना शेळके यांच्यामुळे दुखावलेल्या लोकांनी व्यक्त केली. मात्र त्यांच्या विभागाकडून कोणतीच कारवाई झाली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान एसीबीने अटक केल्यानंतर ते जामिनावर सुटले आहे. पण ते सध्या कोणत्याच कार्यालयात रुजू झालेले नाही.नवीन खनिकर्म अधिकारी रुजूशेळके यांचे निलंबन अद्याप झाले नसले तरी त्यांचा गडचिरोलीतील प्रभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी रणज्योतसिंग सोखी हे दाखल झाले असून त्यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून पूर्णवेळ पदभार स्वीकारला आहे. पंजाब कॅडरमधून आलेल्या सोखी यांनी आपल्या कार्यकाळात कोणत्याही नियमबाह्य कामांना थारा दिला जाणार नाही, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण