लॉकडाऊनचे नियम तोडून विवाह, वधुपित्याला ठाेठावला ५० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST2021-05-21T05:00:00+5:302021-05-21T05:00:29+5:30
आरमोरीच्या शास्त्रीनगर बीएसएनएल टॉवरजवळील संतोषसिंग रंजितसिंग जुनी यांच्या मुलीचा विवाह २० मे रोजी होता. या विवाहात २०० पेक्षा अधिक लोक उपस्थित आहेत, अशी माहिती मिळताच आरमोरी नगर परिषद व तहसील कार्यालयाच्या संयुक्त पथकाने विवाहस्थळी जाऊन पाहणी केली. त्यात विवाह समारंभात २०० पेक्षा अधिक लोक आढळून आले.

लॉकडाऊनचे नियम तोडून विवाह, वधुपित्याला ठाेठावला ५० हजारांचा दंड
लाेकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी शासन-प्रशासनाने जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करून विवाह समारंभ आयोजित करणाऱ्या आरमोरी येथील वधुपित्याला ५० हजारांचा दंड आकारण्यात आला. सदर कारवाई तहसील कार्यालय व नगर परिषदेच्या वतीने गुरुवारी संयुक्तरीत्या करण्यात आली.
आरमोरीच्या शास्त्रीनगर बीएसएनएल टॉवरजवळील संतोषसिंग रंजितसिंग जुनी यांच्या मुलीचा विवाह २० मे रोजी होता. या विवाहात २०० पेक्षा अधिक लोक उपस्थित आहेत, अशी माहिती मिळताच आरमोरी नगर परिषद व तहसील कार्यालयाच्या संयुक्त पथकाने विवाहस्थळी जाऊन पाहणी केली. त्यात विवाह समारंभात २०० पेक्षा अधिक लोक आढळून आले.
संतोषसिंग जुनी यांनी लॉकडाऊनचे नियम तोडून हा समारंभ आयोजित केल्याने त्यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई नायब तहसीलदार संजय राठोड, मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे, पाणीपुरवठा अभियंता नितीन गौरखेडे, तलाठी पी.जी. गजभिये, तहसील कार्यालयाचे महसूल सहायक संदीप तुपट, प्रशांत भैसारे, नगर परिषदेचे कर्मचारी राजू कांबळे, मोहन कांबळे, सुधीर सेलोकर, मंगेश चिचघरे आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.