शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
3
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
4
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
5
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
6
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
7
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
8
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
9
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
10
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
11
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
12
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
13
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
14
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
15
मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
16
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
17
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
18
भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

४७ कोटी ७४ लाखांचा बोनस वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात आविका संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते. शेतकऱ्यांचा माल आविका संस्थेच्या केंद्रांवर विक्रीसाठी यावा, तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने शासनाच्या वतीने बोनस दिला जातो. गेल्या काही वर्षापासून क्विंटलमागे शेतकऱ्यांना २०० रुपये प्रमाणे बोनस वितरित केला जात होता.

ठळक मुद्दे३६ हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ : आदिवासी विकास महामंडळातर्फे रक्कम थेट खात्यात जमा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीअंतर्गत आधारभूत खरेदी योजनेंतर्गत २०१८-१९ च्या हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी करण्यात आली. महामंडळाच्या वतीने जिल्हाभरातील ३६ हजार ४५८ शेतकऱ्यांना ४७ कोटी ७४ लाख ४५ हजार रुपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात आविका संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते. शेतकऱ्यांचा माल आविका संस्थेच्या केंद्रांवर विक्रीसाठी यावा, तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने शासनाच्या वतीने बोनस दिला जातो. गेल्या काही वर्षापासून क्विंटलमागे शेतकऱ्यांना २०० रुपये प्रमाणे बोनस वितरित केला जात होता. गतवर्षीच्या हंगामात युती शासनाने प्रतीक्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला होता. त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा, घोट व अहेरी असे सहा उपप्रादेशिक कार्यालये आहेत. या उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत जवळपास ८० केंद्रांवरून गतवर्षीच्या हंगामात धानाची खरेदी करण्यात आली. खरेदी केल्यानंतर महामंडळाच्या वतीने धान चुकाऱ्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात अदा केली जाते. मात्र बोनसची रक्कम वळती करण्यासाठी विलंब लागतो. कारण आविका संस्थांकडून खरेदीचा संपूर्ण हिशोब व हुंड्या तसेच विवरण सादर करणे आवश्यक आहे. हे विवरण सादर होण्यासाठी हंगामात दोन ते तीन महिन्यांचा अवधी लागतो. त्यानंतर महामंडळ कार्यालयाच्या वतीने आविका संस्थेचा खरेदीचा हिशेब तपासून व बँक खात्याची पडताळणी करून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात क्विंटलनुसार बोनसची रक्कम अदा केली जाते. २०१८-१९ च्या हंगामात आविका संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री केलेल्या ३६ हजार ४५८ शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपयानुसार एकूण ४७ कोटी ७४ लाख ४५ हजार ५२५ रुपये इतकी रक्कम बोनसच्या स्वरूपात अदा करण्यात आली आहे. महामंडळाच्या वतीने ही कार्यवाही एप्रिल ते आॅक्टोबर २०१९ आली आहे.

५० क्विंटलपर्यंत मर्यादा
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गतवर्षीच्या हंगामात साधारण प्रतीच्या धानाला प्रती क्विंटल १ हजार ७५० रुपये भाव देण्यात आला. तसेच प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस देण्यात आला. त्यामुळे क्विंटल मागे २ हजार २५० रुपये भाव शेतकऱ्यांना पडला. मात्र बोनसची मर्यादा ५० क्विंटलपर्यंत आहे. ५० क्विंटलपेक्षा अधिक धान विकलेल्या शेतकºयाला बोनस लागू होत नाही. ५१ व्या क्विंटलपासून पुढे धानाला बोनस दिला जात नाही.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड